Chhagan Bhujbal Debt : नाशिकमधून छगन भुजबळ लढणार? उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच टाकलं पहिलं पाऊल

Lok Sabha Election 2024 : खासदार हेमंत गोडसेंनी नाशिकसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना गळ घातली आहे, तर साताऱ्याच्या बदल्यात नाशिक या कथित सूत्रानुसार येथून अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी लोकसभेची तयारी सुरू केली आहे.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Nashik Political News : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्हा बँकेचे Nashik District Bank थकीत कर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. भुजबळ कुटुंबीयांनी कर्जाचा पहिला हप्ता म्हणजेच साडेसहा कोटी रुपये भरले आहेत. ऐन लोकसभेच्या तोंडावर भुजबळांनी सुमारे दहा वर्षांपूर्वीचे कर्ज फेडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून भुजबळ निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे. Chhagan Bhujbal paying EMI of Nashik District Bank.

महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. नाशिक शिंदे गटाकडे असताना येथून भाजप आणि अजित पवार गटाने दावा ठोकला आहे. खासदार हेमंत गोडसेंनी Hemant Godse नाशिकसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना गळ घातली आहे, तर साताऱ्याच्या बदल्यात नाशिक या कथित सूत्रानुसार येथून अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी लोकसभेची तयारी सुरू केली आहे. त्यातून उमेदवारीबाबत कुणी आक्षेप घेऊ नये, यासाठी भुजबळांनी कर्जफेड करण्याकडे लक्ष दिल्याचे बोलले जात आहे.

नाशिकमधील मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील भुजबळांच्या Chhagan Bhujbal मालकीच्या आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याकडे 51 कोटी 66 लाखांची थकबाकी आहे. या कारखान्याचे संचालक छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ आणि पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांना प्रशासनाने नोटीस बजावली होती. या नोटिशीनंतर भुजबळ कुटुंबीयांनी जिल्हा बँकेकडून वन टाइम सेटलमेंट योजनेत थकबाकी भरण्यासाठी अर्ज केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कारखान्यास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 30 कोटींचे कर्ज दिले होते. समान चार हप्त्यात परतफेड कर्जाच्या वाढत्या थकबाकीमुळे काही वर्षे हे आर्थिक अडचणीत सापडलेल्या बँकेने वसुलीसाठी बड्या थकबाकीदारांकडे मोर्चा वळविला आहे. याच पार्श्वभूमीवर आर्मस्ट्राँग कारखान्याकडील 52 कोटींचा थकबाकीपैकी निम्मी रक्कम माफ करण्यात आली, तर समान चार हप्त्यांमध्ये उर्वरित 26 कोटींची रक्कम भुजबळांना आता फेडायची आहे. त्याच अनुषंगाने 6 कोटी 50 लाखांचा पहिला हप्ता कंपनीने बँकेस दिला आहे.

Chhagan Bhujbal
Ashok Chavan News : महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या पेचाला अशोक चव्हाण जबाबदार?

नाशिकचा तिढा कायम असताना, तसेच उमेदवारी मिळण्यापूर्वीच त्या दृष्टीने भुजबळांनी बँकेची थकबाकी भरणे सुरू केले आहे. भुजबळ कुटुंबीयांच्या मालकीच्या आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याच्या माध्यमातून नाशिक जिल्हा बँकेची साडेसहा कोटींची थकबाकी भुजबळांनी भरली आहे. त्यामुळे काही दिवसांपासून मंत्री भुजबळ लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याच्या चर्चेला आता पुन्हा जोर आला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Chhagan Bhujbal
EVM Theft News : 'ईव्हीएम' चोरी प्रकरणातील अधिकाऱ्यांचे निलंबन अखेर रद्द !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com