Parbhani News : परभणीत बंगला बांधणार; माझ्या घरात वाघ, साप, मांजर पाणी पिऊन जाणार.. ; जानकरांचं अनोखं स्वप्न

Lok Sabha Election 2024 : असा बंगला बांधणार की त्याला दारच नसेल, माझ्या घरात वाघ, साप, मांजर, माणूस पाणी पिऊन जाईल...
Parbhani News
Parbhani NewsSarkarnama

Parbhani News : परभणी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक सर्वात चर्चेची अशी आहे. कारण या ठिकाणी दोन वेळा शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर शिवसेनेचे उमेदवार संजय ऊर्फ बंडू जाधव खासदार राहिले आहेत. आता ते तिसऱ्या वेळी खासदार होण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र या वेळी त्यांच्याकडे धनुष्यबाण नसून मशाल हे निवडणूक चिन्ह आहे, तर दुसरीकडे महायुतीकडून रासपचे महादेव जानकर रिंगणात आहेत. मात्र, या निवडणुकीत 'स्थानिक आणि बाहेरचा' असा प्रचाराचा मुद्दाही बनला होता. आता यावर जानकर यांनी अफलातून तोडगा काढला आहे. जानकर यांनी 'सरकारनामा'ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीची तुफान चर्चा आहे.

Parbhani News
Sunil Chavan Join BJP: धाराशिवमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव सुनील चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार

'सरकारनामा'ला दिलेल्या एका मुलाखतीत महादेव जानकर यांनी परभणीत मतदारसंघात एक आगळा वेगळा बंगला बांधणार असल्याचे त्यांनी आपला भविष्यातील संकल्प बोलून दाखवला. मी आजपर्यंत सातारकर होतो. मात्र, यानंतर आपण परभणीकर (Parbhani) होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. माझा या बंगल्याला दारच नसेल, असेही त्यांनी सांगितले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Parbhani News
Sunil Chavan Join BJP: धाराशिवमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव सुनील चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार
Parbhani News
NCP Sharadchandra Pawar News : शरद पवारांचा मराठवाड्यात झंझावात; बीडमध्ये तीन तर संभाजीनगरात एक सभा घेणार..

महादेव जानकर (Mahadev Jankar) म्हणाले, "माझं राजकारण दिल्ली, मुंबई, परभणी या भोवती वसलेलं आहे. मी आजपर्यंत सातारकर होतो आणि आता मी परभणीकर होणार आहे. परभणीत मी स्वत:चं घर घेतोय. मी परभणी मतदारसंघात बंगला बांधणार आहे. या माझ्या बंगल्याला दार नसेल. माझ्या बंगल्यात कुणीही यावं. सापही येऊन पाणी पिऊन गेला पाहिजे. मांजरही येऊन गेला पाहिजे. जंगली वाघही येऊन गेला पाहिजे आणि माणूसही आला पाहिजे, अशा प्रकारचा मी बंगला बांधणार आहे. आजपर्यंत माझा बंगला कुठेच नाही. पण परभणीत मी अशा पद्धतीचा बंगला बांधणार आहे," असा आपला संकल्प त्यांनी बोलून दाखवला.

  • R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com