Lok Sabha Election 2024 : पक्ष एकत्र आले मात्र मुद्दा निघाला मराठा आरक्षणाचा !

Mahayuti Melava : आगामी लोकसभा निवडणुकीची भाजपने जोरदार तयारी केली आहे. याचाच भाग म्हणून रविवारी जिल्हा निहाय महायुतीतील मित्रपक्षांचे कार्यकर्ता मेळावे घेतले. महायुतीमध्ये मित्रपक्षांची संख्या वाढत आहे.
vinayak mete, tanaji shinde
vinayak mete, tanaji shindesarkarnama
Published on
Updated on

Beed : लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महायुतीतील मित्र पक्षांची बैठक पार पाडली. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला निवडूण देण्याच आव्हान करण्यात आले. मात्र, या सगळ्यात मराठा आरक्षणाचा मुद्द प्रामुख्याने सोडवला पाहिजे, अशी थेट भूमिका बीडमध्ये 'शिवसंग्राम'कडून मांडण्यात आली.

मराठा आरक्षण (maratha reservation) आंदोलनातून तयार झालेली स्थिती निवळायची असेल आणि लोकसभा निवडणुका निकोप वातावरणात पार पाडायच्या असतील तर मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभा निवडणुका (maratha reservation) लागण्याआधी निकाली काढणे गरजेचे आहे. तरच खऱ्या अर्थाने आपण लोकसभेची निवडणूक निकोप वातावरणात करू शकू, अशी भूमिका शिवसंग्रामकडून प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी यांनी मांडली. या खेपेला बीडमध्ये शिवसंग्रामचा महायुतीसोबत असल्याची ग्वाही देखील तानाजी शिंदे यांनी दिली.

vinayak mete, tanaji shinde
Milind Deora : देवरांचा प्रवेश दिल्लीत ठरला, शिंदेंना कानोकान नव्हती खबर !

आगामी लोकसभा निवडणुकीची भाजपने जोरदार तयारी केली आहे. याचाच भाग म्हणून रविवारी जिल्हा निहाय महायुतीतील मित्रपक्षांचे कार्यकर्ता मेळावे घेतले. महायुतीमध्ये मित्रपक्षांची संख्या वाढत आहे. आगामी काळात सर्व नेत्यांमध्ये समन्वय रहावा, गैरसमज दुर व्हावेत, त्यांचे म्हणणे कळावे असा हेतू असलेल्या या जिल्हास्तरीय संमेलनाच्या समन्वयाची धुरा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्याकडे होती. रविवारी येथील मेळाव्याला पालकमंत्री धनंजय मुंडे, खासदार डॉ. प्रितम मुंडे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार बाळासाहेब आजबे, रमेश आडसकर, भीमराव धोंडे, राजेश्वर चव्हाण, अनिल जगताप, कुंडलिक खांडे, अनिल तुरुकमारे आदी महायुतीच्या मित्रपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री एकनाथशिंदे यांनी मराठा आरक्षण मिळवून देण्याची शपथ घेतली आहे. ती शपथ जर पूर्ण करायची असेल तर या सर्व नेतेमंडळींनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे आवाहन करत हा प्रयत्न होत असेल तर आम्ही महायुतीचे घटक पक्ष शिवसंग्राम म्हणून भक्कमपणे आपल्या पाठीशी उभे राहू असेही मत शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी सांगितले.

धनंजय मुडेंना करून दिली आठवण

मनोज जरांगे पाटलांचे दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन स्थगित करावे, यासाठी जे मंत्रिमंडळाचे शिष्टमंडळ गेलो होते त्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले कृषी मंत्री धनंजय मुंडे हे देखील शिष्टमंडळाचे भाग होते. त्यांच्या शब्दाखातर मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केले होते. त्यामुळे मुंडेंनी आणि व्यासपीठावर बसलेल्या सर्व नेत्यांची जबाबदारी बनते. मराठा समाजाला खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल यात मार्ग काढण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला पाहिजे, असे मत तानाजी शिंदे यांनी व्यक्त केले.

(Edited By Roshan More)

vinayak mete, tanaji shinde
Congress Vs Rane : हिंदू धर्मासाठी शंकराचार्यांचे योगदान विचारणाऱ्या राणेंना काँग्रेसचा वानप्रस्थाश्रमाचा सल्ला!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com