Maratha Reservation : मराठा समाजाच्या सर्वेक्षणामध्ये आता सूचनांचे 'विघ्न'?

State Commission for Backward Classes : राज्य मागासवर्ग आयोगाने जाहिरात काढून नागरिकांकडून मागविल्या सूचना
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून पेटलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने प्रत्यक्ष सर्वेक्षण सुरू करण्याचे ठरविले आहे. मात्र त्यापूर्वी नागरिकांककडून सूचना मागविल्या आहेत. येत्या 19 जानेवारीपर्यत नागरिकांना या सूचना देण्याचे आवाहन आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे.

मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास 20 जानेवारीपासून मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा जरांगे यांनी दिलेला आहे. तर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे.

CM Eknath Shinde
PM Modi Nashik Visit: मोदींनी भुजबळांना चुचकारले; म्हणाले, 'सबसे जवान तो आप हो'

त्याचा आवश्यक तो अभ्यास करून कोर्टात टिकेल असे आरक्षण राज्य सरकारच्या वतीने दिले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे. नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशात या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी आवश्यक तो अभ्यास करून त्यानंतरच आरक्षण दिले जाईल, असे स्पष्ट केलेले आहे. मात्र तातडीने हे आरक्षण लागू करावे, समाजातील सर्व घटकांना ओबीसीमधून आरक्षण मिळावे, यावर जरांगे ठाम आहेत.

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अभ्यास करण्याची जबाबदारी राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाकडे दिलेली आहे. त्यानुसार राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचे आर्थिक, समाजिक आणि शैक्षणिक निकषांच्या आधारे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची प्रश्नावली देखील तयार करण्यात आली आहे. त्यानुसार गोखले इन्स्टिट्यूटला संगणकप्रणाली तयार करण्याचे काम सुद्धा देण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यांच्याकडून ते लवकरच तयार होईल, असे अपेक्षित असून त्याची चाचणी घेण्यात येणार आहे. नंतर सर्वेक्षण सुरू होईल, असे चित्र सध्या दिसत आहे. गेल्या आठवड्यात मुंबई येथे झालेल्या मागासवर्ग आयोगाच्या बैठकीत सर्वसाधारणपणे 15 जानेवारीनंतर हे सर्वेक्षण सुरू केले जाईल, असे ठरविण्यात आले होते. त्यामुळे हे सर्वेक्षण लवकरच सुरू होईल, असे संकेत देण्यात आले असून सर्वेक्षणाच्या दृष्टीने आयोगाकडून पावले टाकण्यात येत आहेत.

दरम्यान, आयोगाच्या सदस्य सचिव आशा पाटील यांच्या नावे काही वर्तमानपत्रात शनिवारी एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम सुरू आहे. मराठा समाजाच्या मागासलेपणासंदर्भात काही सूचना करावयाच्या असल्यास पाचशे शब्दांच्या मर्यादेत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे येत्या 19 जानेवारीपर्यंत mscbcpune2@gmail.com या ई-मेलवर पाठविण्यात याव्यात, असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.

CM Eknath Shinde
Shambhuraj Desai : आता ठाकरेंनी रडीचा डाव बंद करून कोर्टात जावं; शंभुराज देसाईंचा सल्ला

आयोगाने जाहिरात काढून नागरिकांकडून सूचना मागविल्याने आता समाजातील विविध घटकांकडून आयोगाकडे सूचनांचा पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांकडून तर या सूचनांचे सर्वेक्षणा दरम्यान, काय करणार आहेत? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

सर्वेक्षण करण्यासाठीची प्रश्नावली आणि धोरण तयार असताना आणि अंतिम टप्प्यात ही प्रक्रिया सुरू असताना या सूचना का मागवल्या ? यामुळे सर्वेक्षणाला विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

(Edited by Amol Sutar)

CM Eknath Shinde
Milind Deora Resigns Congress : मिलिंद देवरांचा काँग्रेसचा राजीनामा; 10 माजी नगरसेवकांसह शिंदे गटात?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com