Lok Sabha Election 2024 News : मराठवाड्यातील आठपैकी सहा लढती ठरल्या; जालना, छत्रपती संभाजीनगरचा सस्पेन्स कायम

Election News : मराठवाड्यातील आठपैकी सहा ठिकाणच्या लढती ठरल्या असून, अद्याप दोन ठिकाणचे उमेदवार जाहीर झाले नसल्याने त्या ठिकाणचे चित्र अस्पष्ट आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या जागेवरून भाजप व शिवसेना शिंदे गटात चुरस आहे.
Shivai kalage, saudhakar shrungare, vasant chavan, pratap patil
Shivai kalage, Sudhakar shrungare, vasant chavan, pratap patilSarkarnama

Political News : मराठवाड्यातील आठपैकी सहा ठिकाणच्या लढती ठरल्या असून, अद्याप दोन ठिकाणचे उमेदवार जाहीर झाले नसल्याने त्या ठिकाणचे चित्र अस्पष्ट आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या जागेवरून भाजप व शिवसेना शिंदे गटात चुरस आहे. दुसरीकडे जालन्याच्या जागेवरून महाविकास आघाडीतील काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटात रस्सीखेच आहे. त्यामुळे या ठिकाणचे उमेदवार जाहीर झाले नाहीत. या दोन्ही मतदारसंघांत चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या मराठवाड्यातील नांदेडमध्ये भाजपने प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Chikhlikhar) यांना, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे वसंत चव्हाण (Vasant Chavan) यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे.

हिंगोली लोकसभेसाठी महायुतीकडून यापूर्वी विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली होती. त्यांच्याऐवजी शिवसेनेचे बाबूराव कदम यांना अचानक उमेदवारी देण्यात आली. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाचे माजी आमदार नागेश पाटील-आष्टीकर असणार आहेत. परभणीमध्ये रासपचे महादेव जानकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार संजय जाधव असा सामना रंगणार आहे. (Lok Sabha Election 2024 News)

Shivai kalage, saudhakar shrungare, vasant chavan, pratap patil
Navneet Rana News : आमदार पतीपेक्षा खासदार पत्नी श्रीमंत; पाच वर्षांत संपत्तीत एवढ्या टक्‍क्‍यांनी वाढ

तिसऱ्या टप्प्यात निवडणूक होणाऱ्या धाराशिवमध्ये महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात महायुतीच्या अर्चना पाटील अशी लढत होणार आहे, तर दुसरीकडे लातूर मतदारसंघातून महायुतीचे सुधाकर शृंगारे यांच्या विरोधात काँग्रेसकडून डॉ. शिवाजीराव काळंगे यांना मैदानावर उतरवले आहे. चोथ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या बीडमधून भाजपच्या पंकजा मुंडे यांच्याविरोधात महाविकास आघाडीने बजरंग सोनवणे यांना मैदानात उतरवले आहे

त्यामुळे मराठवाड्यातील जवळपास सहा मतदारसंघांतील लढती ठरल्या असून, प्रचारालाही वेग घेतला आहे. अद्याप छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचा उमेदवार जाहीर झाला नाही तरी दुसरीकडे जालन्यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा बाकी आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर जालन्यामध्ये महायुतीकडून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे मैदानात उतरले आहेत. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील लढतीचे ठिकाणचे उमेदवार घोषणा करण्यात आले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

छत्रपती संभाजीनगर व जालना मतदारसंघांत चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे येथील उमेदवारी घोषित करण्यास दिरंगाई केली जात असल्याचे समजते. छत्रपती संभाजीनगरची जागा महायुतीमध्ये कोणाला सुटणार याकडे लक्ष लागले आहे. भाजपला ही जागा सुटल्यास भागवत कराड यांना उमेदवारी दिली जाईल, तर शिवसेना शिंदे गटाला जागा सुटल्यास या ठिकाणी मंत्री संदीपान भुमरे हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असू शकतात.

दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये जालना येथील जागा काँग्रेसला सुटली तर कल्याण काळे (Kalyan Kale) यांना निवडणूक रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. जर ही जागा शिवसेना ठाकरे (Shivsena) गटाला सुटल्यास अन्य नावाचा विचार होऊ शकतो. त्यामुळे येथील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

R

Shivai kalage, saudhakar shrungare, vasant chavan, pratap patil
Lok Sabha Election: शिंदे गट आता दोन-चार महिन्यांचा पक्ष..., शिंदे गटाने उमेदवार बदलताच ठाकरे गटाचा हल्लाबोल

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com