Amravati News : लोकसभेच्या निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. विशेषतः सत्ताधारी व विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच महायुतीमधील जागावाटपावरून अमरावती लोकसभा निवडणुकीत मोठी रस्सीखेच पाहावयास मिळाली. त्यावरून एकीकडे अमरावतीच्या लढतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अमरावती मतदारसंघात भाजपने (Bjp) विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर सुरुवातीला भाजपसह महायुतीमधील शिवसेना व बच्चू कडू यांनी विरोध करीत वातावरण तापवले होते. मात्र, हा विरोध मावळला, त्यानंतर सुप्रीम कोर्टाने राणा यांच्या जातप्रमाणपत्रावर घेतलेले आक्षेप फेटाळले आहेत. (Navneet Rana News)
त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या उपस्थितीत गुरुवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला. अमरावतीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने खासदार नवनीत राणा, काँग्रेसने आमदार बळवंत वानखडे यांना, तर प्रहार जनशक्ती पक्षाने दिनेश बूब यांना उमेदवारी दिली आहे.
खासदार नवनीत राणा यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांमध्ये 41.87 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीचे विवरण देण्यात आले आहे. 2019 च्या निवडणुकीच्या वेळी नवनीत राणा यांची जंगम आणि स्थावर मालमत्ता मिळून एकूण संपत्ती ही 11 कोटी 20 लाख 54 हजार 703 रुपये इतकी होती. आता ती 15 कोटी 89 लाख 77 हजार 491रुपये असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे त्यांच्या संपत्तीत 4.69 कोटींची म्हणजे 41 टक्के वाढ झाल्याचे पुढे आले आहे. खासदार नवनीत राणा या त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यापेक्षा श्रीमंत असल्याचे पुढे आले आहे.
दुसरीकडे आमदार असलेल्या रवी राणा यांच्याकडे जंगम आणि स्थावर मिळून 7 कोटी 48 लाख 68 हजार 983 रुपये इतकी संपत्ती आहे. 2019 मध्ये त्यांच्याकडे 1 कोटी 51 लाख 63 हजार 723 रुपये इतकी संपत्ती होती. रवी राणांच्या एकूण संपत्तीत 79 टक्क्यांची वाढ झाली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नवनीत राणा यांच्याकडे 20.74 लाख रुपये किमतीची टोयॅटो फॉर्च्युनर आणि 4.50 लाख रुपये किमतीची फॉर्च्युनर कार अशी दोन वाहने त्यांच्याकडे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आमदार रवी राणांकडे 14.53 लाखांची स्कॉर्पिओ क्लासिक आणि 40.24 लाखांची एमजी ग्लॅस्टोर कार ही वाहने आहेत.
नवनीत राणांकडे 55.37 लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आहेत. नवनीत राणा यांचे कर्जासह एकूण दायित्व 7.27कोटी रुपये, तर रवी राणा यांचे दायित्व हे 3.02 कोटी रुपये असल्याचे नवनीत राणा (Navneet rana) यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
नवनीत राणांकडे 5.32 कोटींची जंगम आणि 10.57 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. रवी राणांकडे 3.59 कोटींची जंगम आणि 3.88 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. पाच वर्षांमध्ये नवनीत राणांच्या संपत्तीत 4.69 कोटींची, तर रवी राणांच्या संपत्तीत 5.97 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
R