Marathwada Lok Sabha Election Result 2024 Live: मराठवाड्यात महायुतीचा सुपडासाफ, बीड, संभाजीनगर वगळता 6 मतदारसंघात 'बॅकफूट'वर

Beed, Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Election Result 2024 Live : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्यातील मुख्यमंत्री दोन्ही, उपमुख्यमंत्री यांनी मराठवाड्यात जोर लावून सुद्धा मतदारांनी महायुतीला नाकारल्याचे चित्र आहे.
Eaknath Shinde, Devendra Fadanvis, Ajit pawar
Eaknath Shinde, Devendra Fadanvis, Ajit pawarSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Lok Sabha Result 2024 : राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीची मराठवाड्यात पुरती पीछेहाट झाली आहे. आठ पैकी बीड, छत्रपती संभाजीनगर वगळता इतर सहा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांची दमछाक झाल्याचं पहायला मिळत आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्यातील मुख्यमंत्री दोन्ही, उपमुख्यमंत्री यांनी मराठवाड्यात जोर लावून सुद्धा मतदारांनी महायुतीला नाकारल्याचे चित्र आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे जालना मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. काँग्रेसच्या (Congress) कल्याण काळे यांनी त्यांच्यावर 11 हजार मतांची आघाडी घेतली आहे. बीड मतदासंघात भाजपच्या पंकजा मुंडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग अप्पा सोनवणे यांच्यापेक्षा साडेपाच हजार मतांनी आघाडीवर आहेत.

तर मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात महायुतीचे संदीपान भुमरे हे एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यापेक्षा 24 हजार मतांनी पुढे आहेत.

बीड, संभाजीनगर वगळता इतर सहा ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी भक्कम आघाडी घेतल्याचे चित्र आहे. नांदेडमध्ये काँग्रेसच्या वंसत चव्हाण यांनी महायुतीचे प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर 20 हजार मतांची आघाडी घेत अशोक चव्हाण-चिखलीकर जोडीला दणका दिला आहे.

परभणीत महादेव जानकरांना उमेदवारी देऊन केलेली खेळी महायुतीच्याच अंगलट आल्याचे दिसत आहे. इथे शिवसेना ठाकरे गटाच्या संजय जाधव यांनी 58 हजार मतांची निर्णायक आघाडी घेत महायुतीला दणका दिला आहे.

लातूर मतदारसंघात महाविकास आघाडीचे डॉ. शिवाजी काळगे हे भाजपच्या सुधाकर शृंगारे यांचे ऑपरेशन करण्यात यशस्वी ठरताना दिसत आहेत. 30 हजारांची आघाडी घेत त्यांनी विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. अमित देशमुख, धीरज देशमुख, दिलीपराव देशमुख व संपुर्ण कुटुंबाने घेतलेली मेहनत फळाला येताना दिसतं आहे.

Eaknath Shinde, Devendra Fadanvis, Ajit pawar
Loksabha Election Result 2024 : अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजित कदम ठरले 'सच्चे खिलाडी'

धाराशिवमध्ये अपेक्षेप्रमाणे ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांनी एकहाती विजय मिळवण्याच्या दृष्टीने तब्बल एक लाखांचे मताधिक्य मिळाले आहे. इथे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांना मतदारांनी नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे.

हिंगोली मतदारसंघात विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलून बाबुराव कदम यांना देण्यात आली होती. भाजपच्या दबावाला बळी पडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला हा प्रयोग फसला आहे. इथे ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर विजयाच्या दिशेने निघाले आहेत. तीस हजारांहून अधिकचे मताधिक्य त्यांनी घेतले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com