Loksabha Election Result 2024 : अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजित कदम ठरले 'सच्चे खिलाडी'

Amit Deshmukh, Satej Patil, Vishwajeet Kadam : अमित देशमुख, सतेज पाटील आणि विश्वजित कदम यांच्या रूपाने या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आश्वासक चेहरे मिळाले आहेत. या तरुण नेतृत्वाकडे लक्ष देऊन काँग्रेसश्रेष्ठी त्यांना बळ देतात का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Amit Deshmukh, Satej Patil, Vishwajeet Kadam
Amit Deshmukh, Satej Patil, Vishwajeet KadamSarkarnama

Maharashtra Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसला महाराष्ट्रात धक्क्यावर धक्के बसले. दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण यांच्यासारखे नेते भाजपमध्ये गेले. त्यामुळे पक्षसंघटनेत मरगळ आल्याचे चित्र निर्माण झाले. अशाही कठीण परिस्थितीत काँग्रेसचे तरुण चेहरे तग धरून राहिले, त्यांनी संघर्षाची वाट सोडली नाही.

यातूनच लातूरचे अमित देशमुख(Amit Deshmukh), कोल्हापूरचे सतेज पाटील यांना झळाळी मिळाली. काँग्रेसचे विश्वजित कदमही चमकले, मात्र त्यामुळे महाविकास आघाडीच ठिणगी तर पडणार नाही ना, असा प्रश्न समोर येत आहे.

Amit Deshmukh, Satej Patil, Vishwajeet Kadam
Vishwajeet Kadam : 'जंगल भी हमारा...राज भी हमारा' सांगलीत विश्वजित कदमांनी फोडली डरकाळी!

अशोक चव्हाण(Ashok Chavan) भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा सुरू होती, त्यावेळी अमित देशमुखही पक्ष सोडणार अशा अफवा पसरल्या होत्या. गेल्या पाच वर्षांत पक्षांतरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससारखे पक्ष फुटले होते. काँग्रेसने ज्यांना दोनवेळा मुख्यमंत्री केले, ते अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले. त्यामुळे काहीही होऊ शकते, म्हणजे अमित देशमुखही भाजपमध्ये जाऊ शकतात, असे लोकांना वाटू लागले होते. राज्याच्या राजकारणात काका-पुतण्यांच्या वादाचे अनेक प्रसंग घडले आहेत.

Amit Deshmukh, Satej Patil, Vishwajeet Kadam
Kolhapur Lok Sabha Constituency: मंडलिकांच्या शिलेदाराचा गड शाहू महाराजांनी फोडला, एकट्या राधानगरीतून 15 हजारांचं लीड

लातूरला मात्र वेगळे चिंत्र पाहायला मिळेत लातूरचे पुतणे म्हणजे आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख आणि अभिनेता रितेश देशमुख हे त्यांचे काका माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्यावर अतोनात प्रेम करतात. हे सांगताना एका कार्यक्रमात रितेश देशमुख यांना अश्रू अनावर झाले होते.

याच कार्यक्रमात रितेश देशमुख यांनी मोठे बंधू अमित देशमुख यांना मालाचे सल्ले दिले. पुढाकार घेऊन राजकारण करण्याचे आवाहन केले. माजी मंत्री देशमुख यांनीही अमित देशमुखांना मार्गदर्शन केले, असे सांगितले जाते. त्यानंतर अमित देशमुख सक्रिय झाले. गेल्या दोन निवडणुकांत लातूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसला पराभव पत्करावा लागला होता. या निवडणुकीत देशमुख काका-पुतणे सक्रिय झाले. त्यांनी डॉ. शिवाजी काळगे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळवून दिली.

डॉ. काळगे हे जंगम समाजाचे आहेत. लिंगायत समाजात जंगम समाजातील व्यक्तीला आदराचे स्थान असते. त्यामुळे काळगे यांना उमेदवारी हा देशमुखांचा मास्टरस्ट्रोक ठरला. मतमोजणी सुरू झाली आणि काळगे यांनी सुरवातीपासून आघाडी घेतली. दुपारपर्यंत त्यांची आघाडी ७० हजारांवर गेली होती.

कोल्हापूरमधून काँग्रेसने छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या उमेदवारीकडे सामाजिक परिवर्तनाची लढाई म्हणून पाहिले जाऊ लागले. कोल्हापूरचे सतेज पाटील(Satej Patil) शाहू महाराजांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. गेल्या काही वर्षांत धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांनी काही राजकीय प्रसंगांमध्ये मात दिली होती. त्यापूर्वी काही निवडणुकांमध्ये सतेज पाटील यांनी महाडिकांवर मात केली होती.

या निवडणुकीत शाहू महाराजांच्या विरोधात महायुतीकडून विविद अस्त्रांचा वापर करण्यात आला. ते खरे वारस नाहीत, अशी टीका महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्याकडून करण्यात आली. खऱ्या वारसदारांना शाहू महाराजांच्या विरोधात प्रचारात उतरवण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात तळ ठोकून होते. या सर्वांना एकटे सतेज पाटील हे पुरून उरल्याचे दिसत आहे.

महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून निर्माण झालेला पेच अखेरपर्यंत सुटलाच नाही. काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी केली, त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी, यालाठी आमदार विश्वजित पाटील यांनी दिल्लीपर्यंत चकरा मारल्या. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे विशाल पाटील अपक्ष म्हणून रिंगणात राहिले.

कोल्हापूरची जागा काँग्रेसला सुटली म्हणून सांगली मतदारसंघ शिवसेनेला देण्यात आला. अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असताना हा निर्णय झाला होता. मात्र हा निर्णय घेताना काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना विश्वासात घेण्यात आले नाही, असे सांगितले जात आहे. अपक्ष म्हणून लढलेले विशाल पाटील विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. विश्वजित कदम यांच्या सहकार्याशिवाय विशाल पाटील यांना ही मजल गाठणे शक्यच नव्हते. या अर्थाने विश्वजित कदम हेही चमकले आहेत, मात्र त्यामुळे महाविकास आघाडीत ठिणगी तर पडणार नाही ना, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com