Pankaja Munde News: कुणीतरी बोलतं म्हणून त्यांच्यावर..., पंकजा मुंडेचा जरांगे-पाटलांवर निशाणा

Manoj Jarange Patil News: मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यात शाब्दिक वाद सुरु आहे.
pankaja munde Manoj Jarange Patil
pankaja munde Manoj Jarange Patilsarkarnama

Pankaja Munde On Manoj Jarange Patil: मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यात शाब्दिक वाद सुरु आहे. अशातच आता मुंडे भाऊ-बहीण आपणाला धमकावत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. जरांगेच्या या आरोपावर बोलताना पंकजा मुंडे यांनी त्यांच्यावर बोलण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे.

माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, "मला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे (Pankaja Munde and Dhananjay Munde) यांनी दोन ते तीनवेळा हिणवल्यामुळे माझा नाईलाज झाला. त्यांनी सोशल मीडियावर लिहा, त्याला धमक्या द्या, मारुण टाका असं सांगितलं. शिवाय त्याला पण बीडमध्ये (Beed) यायतं आहे, असं म्हणाल्या, ही त्यांनी मला धमकीच दिली की, मला बीडला येऊ देणार नाही. परंतु मला धमकी देऊ नका आणि असली स्वप्न बघू नका खूप जड जाईल," असं म्हणत जरांगेंनी पंकजा मुंडेंना इशाराच दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, कोणीतरी बोलतं म्हणून त्यावर बोलण्याची आवश्यकता नाही. मला यावर काही बोलायचं नाही, मी माझ्या 22 वर्षाच्या राजकीय जीवनात एका पद्धतीने राजकारण केलं, काम केलं आहे. 5 वर्षे मी माझ्या जिल्हाचं पालकमंत्री म्हणून काम केलं आहे. अचानक कोणीतरी येऊन अशी टिप्पणी करत असलं तर त्यावर बोलण्याची गरज नाही, असं मुंडे म्हणाल्या. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकांचं मतदान पार पडलं तरीही मुंडे विरुद्ध जरांगे हा वाद संपल्याचं दिसत नाहीये.

pankaja munde Manoj Jarange Patil
Rohit Pawar News : बुथ ताब्यात घेण्याचा परळी पॅटर्न; रोहित पवार म्हणाले, धनंजय मुंडेंनी पातळी सोडली...

बीडमध्ये कुठे पंकजा मुंडे पाडा असं सांगितलं?

दरम्यान, बीडमधील निवडणुका पार पडल्यानंतर जरांगे यांनी आम्हाला मुद्दाम विरोधी मानलं जात असल्याचं वक्तव्य केलं होतं. जरांगे म्हणाले, एवढे दिवस तुम्हाला राजगादीवर बसवलं. मराठ्यांनी मतदान केलं. आता असे बोलून मराठ्यांचे उपकार फेडत आहात का? भाजपच्या व्यासपीठावर बसणाऱ्या मराठा (Maratha) नेत्यांना लाज वाटली पाहिजे. मराठ्यांच्या नेत्यांसमोर जातीचा अपमान होतोय. कशाला मराठ्यांनी भाजपच्या (BJP) व्यासपीठावर बसायचं. आम्ही विरोधक नसून आम्हाला विरोध मानलं जातंय. बीडमधील कुठल्या ठिकाणी पंकजा मुंडे किंवा भाजपला पाडा असं सांगितलं? आता असं बोलून उपकार फेडत आहात का? यांना कसं मराठ्यांनी निवडून द्यायचं," असा सवाल जरांगे-पाटील यांनी उपस्थित केला होता.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com