Rohit Pawar News : बुथ ताब्यात घेण्याचा परळी पॅटर्न; रोहित पवार म्हणाले, धनंजय मुंडेंनी पातळी सोडली...

Political News : रोहित पवार यांनी ट्वीटच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत असतानाच बीडच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना मात्र क्लीन चीट दिल्याचं पाहायला मिळत आहे.
Rohit pawar, Pankja munde, dhanjay munde
Rohit pawar, Pankja munde, dhanjay munde sarkarnama
Published on
Updated on

Pune News : गेल्या काही दिवसांपासून निवडणूक प्रक्रियेमध्ये घोळ चालू असल्याचा आरोप करत अनेक व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे ट्विट करत आहेत. रविवारी त्यांनी बीड लोकसभा मतदारसंघातील एक व्हिडिओ ट्विट केला असून या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांच्यावर निशाणा साधत असतानाच बीडच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना मात्र क्लीन चीट दिल्याचं पाहायला मिळत आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतदानावेळी अनेक ठिकाणी गैरप्रकार आणि पैसे वाटप झाल्याचा आरोप रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला होता. हे आरोप करताना रोहित पवार यांनी काही व्हिडिओ देखील ट्विट केले होते. या व्हिडिओच्या आधारावर निवडणूक आयोगाने कारवाई देखील केली. (Rohit Pawar News)

Rohit pawar, Pankja munde, dhanjay munde
Narendra Modi News : मोदी अन् शाह यांच्यानंतर भाजपला मते मिळवून देणारं नेतृत्व कोण?

बारामती लोकसभा मतदारसंघापासून सुरू झालेलं व्हिडिओ पोस्ट करण्याचे सत्र रोहित पवारांचा अद्यापही सुरूच आहे. सध्या त्यांच्या निशाणावर बीड लोकसभा मतदारसंघ असून गेल्या काही दिवसांपासून त्यानी बीड लोकसभा मतदारसंघातील काही व्हिडिओ ट्विट केले असून मतदानात गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप केला आहे.

आज त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला असून बूथ ताब्यात घेऊन मतदान मारण्याचा हा नवा परळी_पॅटर्न महाराष्ट्राला शोभत नसल्याचं म्हटलं आहे. तसेच पंकजा_ताई तुम्ही कदाचित यामध्ये सहभागी नसालही, पण तुमचे बंधुराज कुठल्या पातळीला जाऊ शकतात हे कदाचित तुम्हालाही माहित नसेल असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर आक्षेप

महाराष्ट्रासारख्या राज्यात असे प्रकार घडवून आणण्याची हिम्मत येतेच कुठून? असे प्रकार करण्याची गरज पडतेच का ? सत्तेतून ही हिम्मत येत असेल तर मग ही लोकशाहीसाठी निश्चितच धोक्याची घंटा आहे. निवडणूक आयोगाने स्थानिक मंत्री महोदयासह स्थानिक प्रशासनाची चौकशी करावी ही विनंती. निवडणूक_आयोग किती दिवस बघ्याची भूमिका घेतं, हे बघुया! असे म्हणत निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवरती देखील त्यांनी बोट ठेवले आहे.

(Edited by : sachin waghmare)

Rohit pawar, Pankja munde, dhanjay munde
Rohit Pawar News : 'भटकत्या आत्म्या'नं काय काय केलं; रोहित पवारांनी PM मोदींना सगळंच सांगितलं

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com