Loksabha Election 2024 : काँग्रेसच्या विभागीय मेळाव्यात लातूर लोकसभेचा उमेदवार ठरणार?

Latur Loksabha Election : निलंगेकर, चाकूरकर व देशमुख गटामध्ये उमेदवारीवरून एकमत होणार का? असाही पदाधिकारी, कार्यकर्त्यांना प्रश्न आहेच.
Congress
CongressSarkarnama
Published on
Updated on

Latur Congress News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतेच राज्यात महायुतीचे संयुक्त मेळावे पार पडले. यातून निवडणुकीच्या तयारीत महायुती आघाडीपेक्षा एक पाऊल पुढे असल्याचे दिसून आले. परंतु आता महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे. सोमवारी (ता. 29) लातूरमध्ये काँग्रेस पक्षाचा विभागीय मेळावा वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत होत आहे.

कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला लातूर जिल्हा आता भाजपमय झाला आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला इथून पराभव स्वीकारावा लागला. सातवेळा निवडून येण्याचा विक्रम असलेल्या लातूरमध्ये काँग्रेसची दयनीय अवस्था झाली आहे. दिवंगत काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांनीही राजकारणातून आपले अंग काढून घेतले. (Loksabha Election 2024 )

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Congress
Mahadev Jankar Announcement : महादेव जानकरांचं ठरलं; ‘परभणीतून लोकसभा लढणार अन्‌ जिंकणारही...’

दिवंगत माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचा राजकीय वारसा कोण चालवतंय, यावरूनही वाद आहे. अशोक पाटील-निलंगेकर काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस म्हणून जिल्ह्यात काँग्रेस टिकवण्याचे काम करीत आहेत. परंतु त्यांना देशमुखांची म्हणावी तशी साथ लाभत नाही. विधानसभेची निवडणूक सोपी जावी, यासाठी लोकसभेला देशमुख गटाकडून सेटलमेंटचे राजकारण केले जाते, असा आरोप सातत्याने त्यांच्यावर केला जातो.

त्यामुळे आमदारकी, जिल्हा बँक आणि साखर कारखान्यापलिकडे देशमुखबंधू आणि दिलीपराव या काका-पुतणे पक्षाच्या राजकारणात फारसा रस दाखवत नाहीत. परिणामी 2014-2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सपशेल आपटी खावी लागली. आता 2024 मध्ये तरी काँग्रेस लातूरमधून जिंकण्यासाठी लढणार का? असा सवाल काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते करताना दिसतात.

Congress
Maratha Reservstion : 'आधी फडणवीसांनी अन् आता शिंदेंनी मराठा समाजाला..' ; रावसाहेब दानवेंचं विधान!

महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर आमदार अमित देशमुख स्वतः या विभागीय बैठकीच्यानिमित्ताने सक्रिय झाल्याचे दिसून आले. अन्यथा गेल्या दीड वर्षात जिल्ह्यात काँग्रेसचे अस्तित्व जाणवलेच नाही. उद्या होणाऱ्या विभागीय बैठकीत वरिष्ठ नेत्यांकडून या सगळ्याची दखल घेतली जाते का? लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल? याचे संकेत दिले जातात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

जिल्हा काँग्रेसमध्ये गटबाजी नाही, असे वारंवार सांगितले जाते. मात्र निलंगेकर, चाकूरकर व देशमुख गटामध्ये उमेदवारीवरून एकमत होणार का? हा मोठा प्रश्न असणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com