Mahadev Jankar Announcement : महादेव जानकरांचं ठरलं; ‘परभणीतून लोकसभा लढणार अन्‌ जिंकणारही...’

LOksabha Election 2024 : महादेव जानकर यांच्या दाव्याने महायुतीसमोर अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.
Mahadev Jankar
Mahadev JankarSarkarnama
Published on
Updated on

Parbhani News : राष्ट्रीय समाज पक्षाकडून मी परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे आणि जिंकूनसुद्धा येणार, असा ठाम विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी `सरकारनामा`शी बोलताना व्यक्त केला. भाजप आणि काँग्रेसने शेतकरी, युवकांना वर्षानुवर्षे वचने दिली होती. मात्र, ती त्यांना पूर्ण करता आली नाहीत. ती अपूर्ण राहिलेली वचने मी पूर्ण करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. (Mahadev Jankar will contest the Lok Sabha elections from Parbhani)

महादेव जानकर यांच्या दाव्याने महायुतीसमोर अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार संजय जाधव हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात असल्याने महाविकास आघाडीच्या जागावाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे असेल, हे जवळपास स्पष्ट आहे. महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार) आणि भाजपमध्ये परभणीच्या जागेसंदर्भात जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mahadev Jankar
OBC Leaders Statement : चंद्रकांतदादांचे धक्कादायक विधान; ‘ओबीसी नेत्यांची विधाने ही राजकीयदृष्ट्या बोलण्यासाठी असतात’

भाजपतर्फे जिंतूर विधानसभा मतदारसंघातील आमदार मेघना बोर्डीकर यांचे नाव आघाडीवर आहे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या वतीने राजेश विटेकर यांचे नाव जवळपास निश्चित समजले जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केलेल्या दाव्यामुळे महायुतीसमोर मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे हे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मतदारसंघातून निवडून आलेले आहेत.

जानकर यांच्या दाव्यानुसार मतदारसंघातील बूथस्तरावरील काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचे तीन लाखांहून अधिक मतदार आहेत. तसेच, जानकर हे ओबीसी मेळाव्यात सहभागी झाले होते. बीड येथील मेळाव्यात त्यांनी व्यासपीठावर ओबीसी नेते छगन भुजबळ यांचे पाय धरले होते.

आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी मतदार एकवटला असून या निवडणुकीत ओबीसींची मते एकगठ्ठा पडू शकतात, त्यामुळे ओबीसी मतदारही जानकर यांना कल देऊ शकतो. अशा स्थितीत जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघाची निवड केल्याचे समजते.

Mahadev Jankar
Miraj Pattern : सांगलीत पुन्हा ‘मिरज पॅटर्न’चा डाव; अजितदादा वाढवणार जयंतरावांची डोकेदुखी

महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे उमेदवारी अर्ज भरला, तर त्याचा मोठा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसू शकतो. कारण जानकर यांची मदार धनगर समाज आणि ओबीसी मतदारांवर आहे. नेमका हाच ओबीसी समाज भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक मतदार आहे.

महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागावाटप अद्याप झालेले नाही. तरीसुद्धा राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून स्वत:ची उमेदवारी जाहीर केल्याने महायुतीला त्याचा फटका बसू शकतो, तर ही उमेदवारी महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडणारी ठरू शकते.

Edited By : Vijay Dudhale

R...

Mahadev Jankar
BJP Election Incharge : भाजपने जावडेकरांवर सोपवली अवघड; पण महत्त्वपूर्ण जबाबदारी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com