Loksabha Election 2024 : महायुतीच्या तीनही पक्षांच्या उमेदवारीसाठी जोरबैठका...

Dharashiv Loksabha News : महायुतीतील तिन्ही प्रमुख घटक पक्षांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघात आपणच लढणार, असा दावा केला आहे.
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit PawarSarkarnama

Dharashiv News: लोकसभा निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे. प्रत्येक पक्षाने त्यासाठी कंबर कसून तयारी सुरू केली आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार जवळपास निश्चित झाला आहे. मात्र महायुतीकडून नेमका कोणता पक्ष लढणार आणि उमेदवारीची जबाबदारी कोणावर असणार ? याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. असे असले तरी महायुतीतील तिन्ही प्रमुख घटक पक्षांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघात आपणच लढणार, असा दावा केला आहे. (Loksabha Election 2024)

शिंदे सेना लोकसभेच्या कामाला लागली असून नुकतेच शहरातील संपर्क कार्यालयाचे मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले. भाजपाने छोट्या-मोठ्या बैठकांच्या माध्यमातून रणनीती आखायला सुरुवात केली आहे. तर अजित पवार आपल्या सासुरवाडीत राष्ट्रवादीचे घड्याळ पुन्हा एकदा निवडून यावे यासाठी तयारीला लागलेल्या महाविकास आघाडीसमोर महायुतीच्या माध्यमातून आव्हान देणार का ? याची उत्सुकताही वाढली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Latur Congress : लातूरच्या मेळाव्यात हिंगोलीच्या जागेवरून घोषणाबाजी...

धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा धाराशिव सोलापूर आणि लातूर या तीन जिल्ह्यांमध्ये विखुरलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघ लातूर जिल्ह्यातील औसा आणि निलंगा विधानसभा मतदारसंघातील अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचा धाराशिव लोकसभा मतदारसंघ बनलेला आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेचा धनुष्यबाण खांद्यावर घेऊन उद्धव ठाकरेंचे शिलेदार ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव केला. मागील काही दिवसांत राजकीय पुलाखालून बरेच पाणी निघून गेले.

विधानसभा निवडणुकीनंतर भाजपात प्रवेश केलेले राणाजगजीतसिंह पाटील सर्वांच्या परिचयाचा चेहरा आहे. त्यामुळे ते लोकसभा लढवतील, असा अंदाज बांधला जात आहे. त्याचवेळी सेवानिवृत्त सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांच्या जिल्ह्यात चकरा वाढल्यामुळे भाजप उमेदवारीसाठी त्यांच्या नावाची चाचपणीचीही चर्चा होत आहे. पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यावर जिल्ह्यातील वेगवेगळ्या घटकांची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. आक्रमक भाषणशैली आणि वादग्रस्त विधानांमुळे ते नहेमी चर्चेत असतात.

महायुतीमध्ये धाराशिवची जागा कोणाला सुटणार ? हे अद्याप निश्चित नसतांना तानाजी सांवत यांनी मात्र लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करून आपली सुप्त इच्छा व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर त्यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी जिल्हाभरात भावी खासदार असा स्वतःचा उल्लेख करणारी बॅनरबाजी केली आहे. आता अद्याप उमेदवारच निश्चित नाही तोवरच गुडघ्याला बाशिंग बांधून जिल्ह्यातल्या मुख्य चौकात भावी खासदार म्हणून झळकत असलेले हे फ्लेक्स नेमके कशाचे द्योतक, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस या जिल्ह्यात कधीकाळी सर्वात बलशाली होती. मात्र शरद पवार आणि अजित पवार या दोघांमध्ये बेबनाव झाला. राष्ट्रवादीत फूट पडली. त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी जिल्ह्यामध्ये खिळखिळी झाली. राष्ट्रवादीला अद्यापही बळ मिळताना दिसत नाही. त्याचवेळी अजित पवार यांची सासरवाडी असलेल्या धाराशिव जिल्ह्यात अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचा राजकीय वेग मात्र सुसाट आहे. त्यांनीही लोकसभा निवडणूक लढवण्याचा दावा केला आहे.

प्रा.सुरेश बिराजदार आमचे उमेदवार असतील, अशी घोषणाच जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी केली आहे. आता अजित पवार सासुरवाडीतील लोकसभेची जागा आपल्याला मिळवण्यात यशस्वी होतात का ? हे देखील पहावे लागेल. मात्र महायुतीच्या तिन्ही प्रमुख पक्षांनी लोकसभेसाठी दावा केल्यामुळे नक्की कोण लढणार अन् कोण जिंकणार? याबद्दलची उत्सूकता वाढली आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar
Ambadas Danve : 28 वर्षानंतर मिळाला दानवेंच्या जनता दरबारात न्याय ; काय आहे प्रकरण...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com