Lok Sabha Election 2024 News: मराठवाड्यातील केवळ दोन जागांवर ठरल्या लढती; हिंगोली, परभणीसह चार ठिकाणी महायुतीत तिढा

Political News : जागावाटप फायनल झाले नसल्याने महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले नाहीत. त्यामुळे सर्वांचे लक्ष जागावाटपाकडे लागले आहे.
Shivai kalage, saudhakar shrungare, vasant chavan, pratap patil
Shivai kalage, saudhakar shrungare, vasant chavan, pratap patilSarkarnama
Published on
Updated on

Marathi News : लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन १३ दिवस झाले आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असतानाच महाविकास आघाडी व महायुतीकडून जागावाटपावर चर्चा सुरू आहे. जागावाटप फायनल झाले नसल्याने महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले नाहीत. त्यामुळे सर्वांचे लक्ष जागावाटपाकडे लागले आहे.

मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी केवळ नांदेड व लातूर या दोन मतदारसंघांतच महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले आहेत. छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड, जालना येथील लढती अद्याप ठरल्या नाहीत, तर दुसऱ्या टप्प्यात नांदेड, हिंगोली, परभणी येथील निवडणूक होणार असतानाही हिंगोली, परभणीतील महायुतीचे उमेदवार ठरले नाहीत. त्यामुळे या ठिकाणच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. (Loksabha Election 2024 News)

Shivai kalage, saudhakar shrungare, vasant chavan, pratap patil
Praful Patel CBI Clean Chit : प्रफुल पटेलांना सर्वात मोठा दिलासा; भ्रष्टाचार प्रकरणी CBI ची क्लीन चिट, क्लोजर रिपोर्ट दाखल...

राज्यातील दुसऱ्या टप्प्यासाठी 28 मार्च रोजी अधिसूचना जारी केली आहे. 4 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 5 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून 8 एप्रिलपर्यंत उमेदवार हे त्यांचा अर्ज मागे घेऊ शकतील. या ठिकाणी 2६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे येत्या काळात हिंगोली, परभणीतील महायुतीचे उमेदवार ठरवावे लागणार आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाने छत्रपती संभाजीनगरमधून माजी खासदार चंद्रकांत खैरे, धाराशिवमधून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, परभणीतून खासदार संजय जाधव तर हिंगोलीतून नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपने बीडमधून पंकजा मुंडे, जालनामधून खासदार रावसाहेब दानवे, लातूरमधून सुधाकर शृंगारे तर नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सहा मतदारसंघांतील लढती अद्याप ठरेनात

महाविकास आघाडीतील काँग्रेसने नांदेडमधून वसंत चव्हाण (Vasnat Chavan), लातूरमधून डॉ. शिवाजी काळगे (Shivaji Kalge) यांना उमेदवारी दिली आहे, तर उर्वरित सहा लोकसभा मतदारसंघातील लढती अद्याप ठरल्या नाहीत, तर दुसऱ्या टप्प्यात नांदेड, हिंगोली, परभणी येथे मतदान होणार असल्याने ४ एप्रिलपर्यंत उमेदवाराची घोषणा करावी लागणार आहे.

R

Shivai kalage, saudhakar shrungare, vasant chavan, pratap patil
Latur Congress News : 'लातूरच्या विकासासाठी हक्काचा वाढपी दिल्लीत पाठवू...'; देशमुखांनी रणशिंग फुंकलं

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com