Amit Deshmukh News : महाविकास आघाडी आणणार महिलांना 'सिटी बस'मध्ये मोफत प्रवासाची योजना

MahaVikas Aghadi will bring free travel scheme for women in city bus : अमित देशमुख यांच्या हस्ते महिलांना मोफत सिटीबस प्रवासाचे स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले. महिलांना सन्मान देण्याचा या योजनेच्या माध्यमातून आपला प्रयत्न असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे.
MLA Amit Deshmukh
MLA Amit DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Latur Congress News : राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या स्पर्धा लागली आहे. विशेषतः विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहीण, वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत यासह अनेक योजना महिलांसाठी सुरू केल्यानंतर आता महाविकास आघाडीनेही दंड थोपटले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तर राज्यातील महिलांसाठी सिटीबसमध्ये मोफत प्रवास योजना राबवली जाईल, असे आश्वासन निवडणूक जाहीरनाम्यात देणार असल्याचे अमित देशमुख यांनी सांगितले.

मराठवाड्यातील काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या लातूर महापालिकेने महिलांसाठी शहर बसमध्ये मोफत प्रवासाची योजना सुरू केली आहे. यासाठी महिलांना स्मार्ट कार्डचे वाटपही करण्यात आले. असा उपक्रम राबवणारी लातूर महापालिका राज्यातील पहिली आणि देशातील दुसरी ठरली असल्याचा दावा काँग्रेस आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी केला. आज या योजनेचा शुभारंभ अमित देशमुख यांच्या हस्ते महिलांना मोफत सिटीबस प्रवासाचे स्मार्ट कार्ड वाटप करून करण्यात आला.

MLA Amit Deshmukh
Amit Deshmukh News : `लाडकी बहीण` राहुल गांधींच्या `गॅरंटी कार्ड` मधील योजना!

महिलांना सन्मान देण्याचा या योजनेच्या माध्यमातून आपला प्रयत्न असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. योजना सुरू करताना मनस्वी आनंद झालेला आहे. ही योजना अधिक प्रभावी ठरण्यासाठी आज, दयानंद गेट येथे महिलांसाठी स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले. संपूर्ण राज्यभरातील सिटी बस मध्ये महिलांना मोफत प्रवास देण्याचे आश्वासन महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात देण्यात येणार आहे. त्यामुळे लातूर मधील महिलांसाठी मोफत सिटी बस सेवा भविष्यात चालूच राहणार आहे, असेही अमित देशमुख यांनी स्पष्ट केले.

काही दिवसापुर्वी अमित देशमुख यांनी महायुती सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही संकल्पना मुळात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या गॅरंटी कार्डमधून आल्याचा दावा केला होता. (Latur) सध्या महायुती सरकारने राज्यातील महिलांना एस.टी. बसमध्ये तिकिट दरात 50 टक्के सवलत दिली आहे. तर 75 वर्ष पुर्ण झालेल्या जेष्ठ नागरीकांना मोफत बस प्रवासाची सवलत सुरू केली आहे.

लातूर महापालिकेने महिलांना सिटी बसमध्ये मोफत प्रवासाची सवलत देत महाविकास आघाडीचे सरकार आले तर हा उपक्रम राज्यभरात राबवण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. एवढेच नाही तर महाविकास आघाडीच्या निवडणूक जाहीरनाम्यात याचा समावेश करण्यात येणार असल्याचे अमित देशमुख यांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com