Mahadev Jankar News : महादेव जानकरांची तिरकी चाल, परभणीतून लढण्याचा निर्णय कोणाच्या भल्यासाठी ?

Latest News About loksabha Election 2024 : महायुतीचा घटक पक्ष राहिलेल्या जानकरांनी वेगळी भूमिका घेतल्याने ते नेमका कोणाचा करेक्ट कार्यक्रम करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Mahadev Jankar
Mahadev Jankar Sarkarnama
Published on
Updated on

Parbhani News : पाच मिनिटांसाठी का होईना, मला देशाचे पंतप्रधान व्हायचे आहे, असे म्हणत चर्चेत आलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याशिवाय माढा मतदारसंघातूनही जानकर लढण्याची शक्यता आहे. महायुतीचा घटक पक्ष राहिलेल्या जानकरांनी वेगळी भूमिका घेतल्याचे ते नेमका कोणाचा करेक्ट कार्यक्रम करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

एकाचवेळी दोन मतदारसंघांत निवडणूक लढण्याची तिरकी चाल खेळत महादेव जानकर कोणाला फायदा पोहाेचवू पाहत आहेत, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. परभणीतील त्यांच्या उमेदवारीने ठाकरे गटाचे संजय ऊर्फ बंडू जाधव यांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाला असलेल्या सहानुभूतीच्या लाटेवर जाधव स्वार होऊ पाहत आहेत.

अशावेळी महायुतीतील पक्षांच्या विरोधातील मतेही जाधव यांच्याकडे वळण्याची शक्यता आहे. असे झाले तर महायुतीच्या उमेदवारासाठी ती धोक्याची घंटा ठरू शकते, पण महादेव जानकर मैदानात उतरले तर महायुतीच्या विरोधातील मतदानाचा फायदा ठाकरे गटाला न होता तो रासपकडे वळेल आणि त्यात महायुतीचेच फावेल, असे बोलले जाते. लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा घोळ अजूनही मिटला नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरायचेच असा निश्चय केलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर Mahayuti महायुती आणि महाविकास Mahavikas Aghadi आघाडी अशा दोन्ही बाजूंनी चाचपणी करत आहेत. मात्र, यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे Pankaja Munde यांचे समर्थक आहेत.

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे Gopinath Munde यांचे मानसपुत्र असल्याचे ते भाषणातून सांगतात. राष्ट्रीय समाज पक्ष प्रामुख्याने राज्यातील धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करतो. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषवले आहे. मात्र, महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षातील BJP नेतृत्वाकडून डावलले जात असल्याची भावना ते सातत्याने व्यक्त करतात. राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलने होत असताना ओबीसी नेत्यांनी राज्यात ठिकठिकाणी ओबीसी OBC एल्गार महासभा आयोजित केल्या.

Mahadev Jankar
Lok Sabha Election 2024 : संजय मंडलिकांसाठी फिल्डिंग, मुंबईत खलबते अन् जिल्ह्यातील नेत्यांचा आग्रह...

बीड येथील महासभेत जानकर यांनी स्वतंत्रपणे परभणी येथून लोकसभा निवडणूक Loksabha Election 2024 लढवण्याचे जाहीर केले. महायुतीच्या जागावाटपापूर्वीच त्यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केल्यामुळे महायुतीच्या घटक पक्षात नाराजीचा सूर उमटू लागला. जानकर यांनी माढा येथूनही निवडणूक लढवण्याची तयारी चालू केली. महायुतीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने जानकर यांनी महाविकास आघाडीचाही पर्याय खुला ठेवला.

आघाडीच्या नेतृत्वाकडून त्यांना अनुकूल प्रतिसाद असल्याचेही त्यांनी सांगितले. महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन्ही पर्याय खुले ठेवल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू केल्याने कार्यकर्त्यांमधील एक गट जानकर यांच्या निर्णयामुळे अस्वस्थ आहे. कारण आजपर्यंत जानकर यांची ठाम भूमिका असायची. मात्र, दोन्ही डगरीवर हात ठेवल्याने त्यांच्या नेतृत्वाविषयी प्रथमच संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

आरक्षणाच्या प्रश्नावरून अस्वस्थता

आरक्षणाच्या प्रश्नावरून धनगर समाजात मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांवर समाजातून रोष व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत एकगठ्ठा मतदान होऊ शकते. या मुद्द्यावरच जानकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा चंग बांधला आहे. मात्र, महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही डगरीवर हात ठेवल्याने कार्यकर्त्यांमध्ये मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिवाय त्यांच्या भूमिकेबद्दल शंकाही घेतली जात आहेत.

Edited By : Rashmi Mane

R

Mahadev Jankar
Sanjay Raut News: संजय राऊत म्हणतात, 'सावरकरांच्या भूमीत राहुल गांधींचा सन्मानच होईल'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com