Lok Sabha Election 2024 : संजय मंडलिकांसाठी फिल्डिंग, मुंबईत खलबते अन् जिल्ह्यातील नेत्यांचा आग्रह...

Sanjay Mandlik News : संजय मंडलिकांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा आहे. भाजपकडून त्यांना पुन्हा उमेदवारी देण्याला विरोध केल्याचे सांगितले जात आहे.
CM Eknath Shinde, Sanjay Mandlik
CM Eknath Shinde, Sanjay MandlikSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर लोकसभा (Lok Sabha Election 2024) मतदारसंघातील शिवसेनेच्या विद्यमान खासदारांविषयी असलेल्या नाराजीमुळे भाजपकडून उमेदवार बदलण्याचा दबाव आहे. विद्यमान खासदारांऐवजी दुसरा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कोल्हापूरच्या उमेदवारीसाठी अनेक नावं समोर येत असताना विद्यमान खासदारांसाठी जिल्ह्यातील काही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन संजय मंडलिक यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची (Kolhapur Lok Sabha Constituency) जागा विद्यमान खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्याकडेच राहण्यासाठी मुंबईत पुन्हा एकदा फिल्डिंग लावली जात आहे. खासदार मंडलिक यांच्याऐवजी भाजपकडून (BJP) शिवसेनेच्या चिन्हावर भाजपचे नेते समरजित घाटगे यांच्या नावाचा पर्याय समोर आल्याची माहिती आहे. तसेच कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदारांविषयी नाराज असल्याची ही माहिती समोर आली आहे.

CM Eknath Shinde, Sanjay Mandlik
Lok Sabha Election 2024 : मनोज जरांगेंना ‘स्वाभिमानी’चे बळ; जालना, बीड लोकसभेसाठी साकडं

मंडलिकांच्या उमेदवारीसाठी जिल्ह्यातील काही नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. त्यामुळे कोल्हापूर आणि हातकणंगलेतील दोन्हीही विद्यमान खासदारांनाच उमेदवारी मिळणार, यावर शिवसैनिक ठाम आहेत. त्यांना जिल्ह्यातील इतर नेत्यांचाही पाठिंबा आहे. यासाठी कालच मुंबईत प्रमुख नेत्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचे खात्रिलायक वृत्त आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात आणि देशात शक्यतो विद्यमान उमेदवारांना पुन्हा संधी दिली जाते. मात्र, जिल्ह्याचेच नव्हे, तर राज्याचे आणि देशाचे राजकारण आता वेगळ्या वळणावर आहे. वेगवगेळे पक्ष एकत्रित आल्यामुळे त्यांच्यामध्ये होणारे जागावाटप आणि विजयी उमेदवारांचे गणित बसविण्याचे दिव्य नेत्यांना पार पाडावे लागत आहे. ‘अब की बार 400 पार’चा नारा महायुतीने दिला आहे. त्यामुळे भाजपकडून प्रत्येक लोकसभा मतदारसंघात उमेदवार तगडा असावा, तो विजयी होणारा असावा, यासाठी फार बारकाईने प्रयत्न सुरू असल्याचे दिसते. यामध्ये जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात विद्यमान उमेदवारांसह अनेक नावे पुढे येत आहेत. मात्र, तरीही दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे (Shiv Sena) उमेदवार असणार यावर एकमत झाल्याचे सांगण्यात येते.

जिल्ह्यातील दोन्ही खासदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी झाले. आता शिवसेनेचे चिन्ह आणि नाव दोन्हीही शिंदे गटाला मिळाले आहे. त्यामुळे त्यांनी या दोन्ही जागांवर आपला दावा केला आहे. विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत काल जिल्ह्यातील शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. तेथेच त्यांनी त्यांचे लॉबिंग केले आहे.

CM Eknath Shinde, Sanjay Mandlik
Lok Sabha Election 2024 : ठाकरेंचा पैलवान सांगलीच्या मैदानात अन् महाविकास आघाडीत वाद पेटला; विशाल पाटलांचे काय?

गट बदलताना निधी आणि पुन्हा खासदारकीची उमेदवारी हा शब्द होता. महायुतीत आजपर्यंतचे सर्व शब्द पाळले आहेत. त्यामुळे महायुतीत काही झाले तरीही जिल्ह्यातील दोन्ही जागा शिवसेनेला असणार आहेत. यासाठी राज्यातील तिन्ही पक्षांचे नेते दिल्लीत कोल्हापूरच्या दोन्ही जागा शिवसेनेला देतील, यामध्ये विद्यमानांना संधी मिळेल, असा विश्‍वास शिवसैनिकांना आहे.

‘धनुष्यबाण’ चिन्हावरच लढणार

रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यातील दोन्ही जागा शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ याच चिन्हावर विद्यमान खासदार लढवतील, हे निश्‍चित मानले जाते. अनेकांची नावे पुढे येत असली तरीही कोल्हापूरमध्ये चंदगड, आजरा, गडहिंग्लज, कागल आणि शहरातील शिवसेनेचे अस्तित्व मुख्यमंत्र्यांना पटवून देण्यात आले आहे. अशीच काहीशी स्थिती ‘हातकणंगले’मध्ये असल्याची चर्चा थेट मुख्यमंत्र्यांसोबत झाल्‍याचे सांगण्यात येते. देशात जो कल असतो तो कोल्हापूर जिल्ह्यात नसतो. त्यामुळे दोन्ही मतदारसंघांत विद्यमानांना संधी देण्याबाबत मुंबईत लॉबिंग झाल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे.

R

CM Eknath Shinde, Sanjay Mandlik
Kolhapur Politics: मुश्रीफांकडून मला त्रास होतोय; भाजपच्या पदाधिकाऱ्याचा गंभीर आरोप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com