Mahadev Munde Case : अठरा महिन्यानंतरही पतीच्या खूनातील आरोपींना अटक नाही, ज्ञानेश्वरी मुंडेंचा आत्मदहनाचा इशारा..

In the Mahadev Munde murder case, his wife Dnyaneshwari Munde has issued a stern warning, demanding the arrest of the accused within 8 days. : वाल्मिक कराड याने मुंडे यांची हत्या करणाऱ्यांना शाबासकी देत गाड्याही गिफ्ट दिल्या, असा खळबळजनक आरोप बांगर यांनी केला आहे.
Mahadev Munde-Dnyaneshwari Munde News
Mahadev Munde-Dnyaneshwari Munde NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : एकेकाळी वाल्मीक कराड याचा सहकारी राहिलेल्या विजयसिंग उर्फ बाळा बांगर याने काल पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले. वाल्मीक कराड यानेच महादेव मुंडे यांचा खून केल्याचा दावाही बांगरने केला होता. त्यानंतर आता महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बाळा बांगर यांचा जबाब पोलीसांनी नोंदवून घेत तात्काळ आरोपींना अटक करावी, अशी मागणी केली.

महादेव मुंडे खून प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी उपोषण केले होते. (Beed News) त्यावेळी पोलीस अधीक्षकांनी लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असे आश्वासन देत त्यांना उपोषण मागे घ्यायला लावले होते. मात्र त्यानंतर बरेच दिवस उलटून गेले तरी पोलीसांनी कुठलीच कारवाई केली नाही. त्यानंतर काल विजय बांगर यांनी पत्रकार परिषद घेत महादेव मुंडे यांचा खून वाल्मीक कराड यानेच आपल्या लोकांकडून घडवून आणल्याचा आरोप केला.

महादेव मुंडे यांची हत्या केल्यानंतर वाल्मिक कराडच्या टेबलवर त्यांची हाडे, मास आणि रक्त आणून ठेवले होते. त्यानंतर वाल्मिक कराड (Valmik Karad) याने मुंडे यांची हत्या करणाऱ्यांना शाबासकी देत गाड्याही गिफ्ट दिल्या, असा खळबळजनक आरोप बांगर यांनी केला आहे. आता महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेत पतीच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.

Mahadev Munde-Dnyaneshwari Munde News
Dhananjay Munde-Shivraj Bangar : वाल्मीक कराड कोणाच्या संपर्कात ? बापू आंधळे खूनाचा कट कुठे शिजला ? याचाही सीडीआर काढा!

महादेव मुंडे खून प्रकरणाला 18 महिने उलटून गेले असले तरी अजूनही आरोपी मोकाट आहेत. यासंदर्भात पोलिसांकडून वारंवार आमची दिशाभूल करण्यात आली. आता आठ दिवसांत आरोपींना अटक झाली नाही तर आपण आत्मदहन करणार असल्याचे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले. बाळा बांगर जाहीरपणे वक्तव्य करत आहेत. त्यानंतर त्यांचा जबाब पोलीस अधीक्षक का घेत नाहीत? आरोपींना अटक का करत नाहीत?

Mahadev Munde-Dnyaneshwari Munde News
Valmik Karad: वाल्मीक कराडच्या जीवाला धोका; नाशिक कारागृहात हलवणार

बांगर दावा करून स्वत: साक्षीदार बनून फिर्याद द्यायला तयार आहेत. त्यानंतरही पोलीस त्यांच्यापर्यंत का पोहचत नाहीत. त्यांची फिर्याद घेऊन आरोपींना अटक का करत नाहीत? असा प्रश्न ज्ञानेश्वरी मुंडे यांनी उपस्थित केला. दरम्यान, पोलिसांनी बाळा बांगर यांचा जबाब घ्यावा आणि आरोपीला अटक करावी. मी आठ दिवस थांबणार आहे.

Mahadev Munde-Dnyaneshwari Munde News
Mahadev Munde latest Update : महादेव मुंडे खून प्रकरणातील गुन्हेगारांच्या तपाससाठी SP नवनीत काँवत यांचा मोठा निर्णय!

त्यानंतर शेवटचे पाऊल म्हणून मी पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात आत्मदहन करणार असल्याचा इशारा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिला आहे. पोलीस अधिकारी सानप यांचा सीडीआर काढण्यात यावा ही माझी पहिल्यापासून मागणी आहे. परंतु त्यांनाही संरक्षण दिले जात आहे. सीडीआर काढून सानप यांना सहआरोपी करा, त्यांचे कोणासोबत कॉल झाले? यातून बरेच काही बाहेर येईल, असेही ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com