
परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाला 16 महिने उलटूनही अद्याप तपास लागलेला नाही. परळी तहसील कार्यालयासमोर भर रस्त्यात खून झाल्यानंतर आता 16 महिने उलटून गेले तरी आरोपी मोकाट आहेत. आता मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी या प्रकरणाच्या तपासणीसाठी पाच सदस्यीय पथकाची नेमणूक केली आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडी किंवा एसआयटीकडे देण्याची मागणी करण्यात आली होती.
महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपासासाठी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी पाच जणांचे पथक स्थापन केले आहे. या पथकात एक पोलीस निरीक्षक आणि चार कॉन्स्टेबलचा समावेश आहे. मुंडे कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षकांच्या घेतलेल्या भेटीनंतर प्रकरणाचा तपास करण्यासाठी पथक स्थापन करण्यात आले आहे. तपासी अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी चोरमले यांच्यासह एलसीबीचे पी आय म्हणून काम केलेले संतोष साबळे यांच्यासह चार कॉन्स्टेबल करणार महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास करतील. तपासाला वेग यावा यासाठी विशेष पोलीस पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभर गाजत असतानाच. त्यांच्या हत्येला दोन महिन्याहून अधिक काळ उलटला आहे. या प्रकरणाचा आरोपी अजूनही फरारच आहे. दरम्यान परळीत झालेल्या महादेव मुंडे खून प्रकरणालाही 16 महिने उलटून गेले तरी तपास यंत्रणा या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत आहेत. अशी भावना मुंडे कुटुंबीयांकडून व्यक्त होत होती.
दरम्यान, या प्रकरणात दोषी असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी भाजपा आमदार सुरेश धस यांनी केली होती. त्यांच्या मागणीचे पत्र देखील पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्याकडे देण्यात आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.