Abhijeet Dipke : 'सोनम वांगचुक यांच्यासोबत जी चूक केली ती जरांगेंबाबत नको!" अभिजीत दिपकेंचा सरकारला इशारा!

Abhijeet Dipke on Jarange Patil protest : ‘हा महाराष्ट्र आहे, सोनम वांगचुक यांच्यासोबत जी केली तीच चूक जरांगेंबाबत नको,’ असा इशारा अभिजीत दिपके यांनी महाराष्ट्र सरकारला दिला.
Abhijeet Dipke : 'सोनम वांगचुक यांच्यासोबत जी चूक केली ती जरांगेंबाबत नको!" अभिजीत दिपकेंचा सरकारला इशारा!
Sarkrnama
Published on
Updated on

Maratha Reservation : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे चौदा दिवसापासून उपोषणाला बसले आहेत. मुख्यमंत्र्‍यांना कॉमेडियनला भेटायला वेळ आहे, त्यांना बिस्कीट खाऊ घातले जात आहेत. मात्र न्याय हक्कासाठी उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी त्यांना वेळ नाही, अशा शब्दात सीजेपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी राज्य सरकारवर टीका केली.

मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन चिरडण्यासाठी दिल्लीच्या जंतरमंतरवरून जसे सोनम वांगचूक यांना जबरदस्तीने उचलून नेण्यात आले. तसा प्रकार सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्याबाबतीत करण्याचा चुकूनही प्रयत्न करू नये. हा महाराष्ट्र आहे, इथे असे खपवून घेतले जाणार नाही. मनोज जरांगे पाटील यांना हात लावला तर सगळा महाराष्ट्र इथे येईल, असा इशाराही दिपके यांनी दिला.

Abhijeet Dipke : 'सोनम वांगचुक यांच्यासोबत जी चूक केली ती जरांगेंबाबत नको!" अभिजीत दिपकेंचा सरकारला इशारा!
Nagaon Lok Sabha bypoll : वादग्रस्त अधिकाऱ्याच्या स्वेच्छानिवृत्तीला 3 सप्टेंबरला मंजुरी, 5 दिवसांत भाजपमध्ये प्रवेश अन् आज लोकसभेची उमेदवारी जाहीर

सोनम वांगचूक यांना सरकारने २६ दिवस उपाशी ठेवले होते. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना चादरीमध्ये गुंडाळून उचलले होते. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सरकारला असेच काही करायचे आहे का? पण महाराष्ट्रात हे सरकारला परवडणार नाही. जरांगे पाटील हे खूप मोठे आहेत, त्यांना हात लावला तर सगळा महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशाराही दिपके यांनी दिला.

मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपोषणाची वेळ का आली? चांगेल शिक्षण, तरुणांच्या हाताला रोजगार दिला असता तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती. एमपीएससी परीक्षेची तयारी करून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पुणे, मुंबईमध्ये जाणारे तरुण आत्महत्या करत आहेत. कारण मोठ्या शहरांमध्ये राहण्याचा खर्च परवडत नाही. सरकार शिक्षण, रोजगार देण्यात अपयशी ठरले आहे, म्हणून विद्यार्थ्यांवर ही वेळ आली आहे.

आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला चौदा दिवस झाले आहेत. पण अजूनही सरकार त्यांची विचारपूस करायला तयार नाही. हे सरकार एवढे निर्दयी कसे झाले आहे? जरांगे पाटील हे स्वतःसाठी नाही तर समाजातील मुलांना चांगले शिक्षण, रोजगार मिळावा यासाठी बसले आहे.

Abhijeet Dipke : 'सोनम वांगचुक यांच्यासोबत जी चूक केली ती जरांगेंबाबत नको!" अभिजीत दिपकेंचा सरकारला इशारा!
Gulabrao Patil : शिंदेंचा पक्ष तीन-चार वर्षांचं बाळ, कोण हिणवतय..? मंत्री गुलाबराव पाटलांनी घेतला समाचार

प्रथमेश देशमुख हा २७ वर्षाचा मुलगा आत्महत्या करतो ते ही फक्त अडीच हजारांच्या कर्जासाठी. हे सरकारचे अपयश नाही का? मनोज जरांगे पाटील अशा समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, रोजगारासाठी उपोषण करत आहेत. त्यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना वेळ नाही का? ज्यांना निवडून दिले ते समाजासाठी लढणाऱ्यांना भेटत नाहीत, त्यांच्याशी बोलायला तयार नाही.

मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या समाजसेवकाला सरकार मरण्यासाठी सोडून देणार आहे का? असा संतप्त सवाल दिपके यांनी केला. प्रथमेश देशमुख सारखी परिस्थिती इतर विद्यार्थ्यांवर येऊ नये, यासाठीच मनोज जरांगे पाटील यांचा हा लढा आहे. सरकारने तातडीने त्यांच्या मागण्याची दखल घ्यावी आणि त्यांचे उपोषण सोडवावे, असे आवाहनही दिपके यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com