Gulabrao Patil News : शिंदेंचा पक्ष तीन-चार वर्षांचं बाळ, कोण हिणवतय..? मंत्री गुलाबराव पाटलांनी घेतला समाचार

Gulabrao Patil Speech : नंदुरबार येथे शिवसेनेचा संघटनात्मक मेळावा पार पडला. यावेळी गुलाबराव पाटील यांनी मित्रपक्षांसह विरोधकांचे कान टोचले. मित्रपक्ष कार्यकर्त्यांवर अन्याय करणार असेल, तर ते कदापिही खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
Gulabrao Patil Speech
Gulabrao Patil Speechsarkarnama
Published on
Updated on

Nandurbar Politics News : नंदुरबारमधील महायुतीत असलेली धूसफूस काल चव्हाट्यावर आली. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेना लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघात विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची बाब उद्योगमंत्री उदय सामंत आणि पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. हे सांगताना त्यांना रडू कोसळलं.... हे बघून मित्रपक्ष कार्यकर्त्यांवर अन्याय करणार असेल, तर ते कदापिही खपवून घेणार नाही, असा इशारा उद्योगमंत्री उदय सामंत, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला.

नंदुरबार येथे गुरुवारी झालेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात शिवसेनेचा संघटनात्मक मेळाव्यात दोघे मंत्री बोलत होते. या वेळी उदय सामंत व गुलाबराव पाटील दोन्ही मंत्र्यांनी महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीला थेट इशारा दिला.

गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यात निधी वितरणाबाबत प्रश्न उपस्थित केला. मीही जळगावचा पालकमंत्री असून, त्याठिकाणी सर्व लोकप्रतिनिधींना निधी देत असतो. त्यामुळे इथल्या पालकमंत्र्यांनाही आमच्या पक्षाच्या आमदारांना निधी द्यावाच लागेल. नंदुरबारचे पालकमंत्री (हसन मुश्रीफ) समन्वय समितीत आहेत, याची त्यांनी जाणीव ठेवावी.

नंदुरबार काय पाकिस्तानात आहे का? असा सवाल उपस्थितीत करत पालकमंत्र्यांना विधानपरिषद आमदाराला निधी द्यावाच लागेल नियम सर्वांना सारखाच आहे. असं गुलाबराव पाटलांनी ठणकावून सांगितलं.

Gulabrao Patil Speech
Nandurbar Politics : शिंदेंच्या आमदाराला अश्रू अनावर, असमान निधी वाटपावरुन खंत ; भर मेळाव्यात दोन मंत्र्यांसमोरच मांडली हतबलता!

गुलाबराव म्हणाले, सकाळी बोलेले तर संध्याकाळी निर्णय असे एकनाथ शिंदे यांचे काम आहे. त्यांनी त्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात अनेक महत्वाचे निर्णय घेतले. विविध योजना आणल्या. पण आज त्यांच्यावर काही लोकांकडून टिका केली जाते. शिंदेंचा पक्ष म्हणजे तीन-चार वर्षाचं बाळ आहे असे विरोधकांकडून हिणवले जाते. ८७ लोकप्रतिनिधी असलेला हा आमचा पक्ष आहे. १५ खासदार आणि ७६ आमदारांचा आमचा पक्ष आहे. हा साधा पक्ष नाही असं गुलाबरावांनी सुनावलं...

तुम्ही आम्हाला किचपट समजू नका, आजवर शिवसेनेला जितका दाबण्याचा प्रयत्न झालाय तितक्याच ताकदीने शिवसैनिक पुन्हा उभा राहिल्याचा इतिहास आहे. त्यामुळे तुम्ही फ्रेश रहा, पुढचे दिवस आपले चांगले आहे, असा आत्मविश्वास त्यांनी नंदुरबराच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिला. आम्ही भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादीसोबत प्रेम केलंय, कुणी आमच्याशी कसेही वागू... पण आम्ही प्रेमच करु असा टोला गुलाबरावांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com