Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील यांनी जरांगेंना भर सभेत दिला शब्द; प्रतिज्ञापत्र दाखवत म्हणाले, 'तुमच्या लोकांपेक्षा जास्त लढू' ...पाहा VIDEO

Imtiaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar East assembly constituency affidavit Manoj Jarange Maratha reservation : माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांना साद घातली आहे.
 Imtiaz Jaleel
Imtiaz JaleelSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : माजी खासदार इम्तियाज जलील सय्यद यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्याला हात घालत, मनोज जरांगे यांना मोठा शब्द दिला.

'तुमच्या लोकांपेक्षा जास्त लढू, एकदा विधानसभा पाठवून बघा, असे म्हणत मराठा आरक्षणासाठी लढू', असा शब्द देणारे प्रतिज्ञापत्र इम्तियाज जलील सय्यद यांनी दाखवले.

एमआयएम पक्षाचे माजी खासदार प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील सय्यद विधानसभा निवडणुकीसाठी औरंगाबाद पूर्व मधून लढत आहेत. मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) प्रश्न गाजतो आहे. मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या लढाईचा फटका लोकसभेला सत्ताधाऱ्यांना बसला. तेव्हापासून जरांगे फॅक्टर चर्चेत आहे. आता विधानसभा निवडणुकीला देखील हा फॅक्टर मराठवाड्यात प्रभाव पाडेल, असे दिसते. यातून मराठा मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार मनोज जरांगे यांच्या गाठीभेटी घेत, वेगवेगळा आश्वासने देत आहेत.

 Imtiaz Jaleel
Sharad Pawar : महिला मुख्यमंत्री पाहण्याची इच्छा; शरद पवारांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण

माजी खासदार इम्तियाज जलील सय्यद (Imtiaz Jaleel) यांनी मराठा आरक्षणावर मनोज जरांगे यांना जाहीर सभेत मोठा शब्द देत, मराठा आरक्षणासाठी लढणार असल्याचे प्रतिज्ञापत्र दाखवले. ते म्हणाले, "एका छोट्या गावातील मनोज जरांगे समाजासाठी लढत आहे. समाजासाठी लढत असतानाच, संपूर्ण महाराष्ट्रातून समाज त्यांच्यामागे एकटवला. यातून महाराष्ट्र हदरला. विधानसभेत राजकीय पडसाद उमटले. मराठा समाज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकटवला होता. अतुल सावे पालकमंत्री होते. त्यावेळी जरांगे यांच्या आंदोलनस्थळी आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला".

 Imtiaz Jaleel
Navneet Rana : नवनीत राणांच्या सभेत मोठा राडा, आक्रमक कार्यकर्त्यांनी अंगावर खुर्च्या फेकल्याचा VIDEO व्हायरल

मराठ्यांसाठी लढणार

इम्तियाज जलील सय्यद यांनी लोकसभेत उभे राहून मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे यांचा उल्लेख केल्याची आठवण करून दिली. सत्ताधाऱ्यांच्या नाकात दम करून ठेवला आहे, याकडे लोकसभेत लक्ष वेधले. जरांगे यांनी आवाहन केले आहे की, आमच्या मुद्याला साथ देईल, त्यांच्याबरोबर आम्ही असणार आहोत. परंतु जरांगे यांनी तर मला याबाबत काहीच सांगितले नसले, तरी आम्ही तुमच्यासाठी लढवू. तसे प्रतिज्ञापत्र देतो, असे सांगून इम्तियाज जलील सय्यद यांनी प्रतिज्ञापत्र दाखवले. मी आणि नासीर सिद्दिकी वचन देतो की, एकदा विधानसभेत पाठवा. आम्ही तुमच्यासाठी एवढे लढू की, तुमचे लोक लढणार नाहीत, तेवढे लढू. हे घ्या प्रतिज्ञापत्र, अशी जाहीर भूमिका मांडून इम्तियाज जलील सय्यद यांनी विरोधकांची कोंडी करून टाकली.

जलील यांना रोखण्यासाठी षडयंत्र

ही भूमिका मांडल्यानंतर इम्तियाज जलील सय्यद यांनी विरोधकांवर षडयंत्रांवर तोंडसुख घेतले. पुढील दोन दिवसात मतदारसंघात अनेक राजकीय घडमोडी घडणार आहे. अनेक राजकीय षडयंत्र घडतील. इम्तियाज जलील सय्यद यांना रोखण्यासाठी या मतदारसंघात 28 मुस्लिम उमेदवार उभे करण्यात आले. त्यातील काहींचे अर्ज बाद झाले. अजूनही 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या उमेदवारांचा प्रचारा एवढ्या धड्यात सुरू आहे की, त्यांच्याकडे पैसा आला कोठून, असा प्रश्न पडला आहे, असा टोला इम्तियाज जलील सय्यद यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com