Navneet Rana : नवनीत राणांच्या सभेत मोठा राडा, आक्रमक कार्यकर्त्यांनी अंगावर खुर्च्या फेकल्याचा VIDEO व्हायरल

Daryapur Assembly Election 2024 : अमरावतीमधील दर्यापूर मतदारसंघातील खल्लार या गावात माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत मोठा राडा झाला आहे. दोन गडात झालेल्या राड्यातील काही आक्रमक कार्यकर्त्यांनी थेट राणा यांच्या अंगावर खुर्च्या फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Navneet Rana Rally Rada
Navneet Rana Rally RadaSarkarnama
Published on
Updated on

Navneet Rana Rally Rada : अमरावतीमधील (Amravati) दर्यापूर मतदारसंघातील खल्लार या गावात माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत मोठा राडा झाला आहे. दोन गडात झालेल्या राड्यातील काही आक्रमक कार्यकर्त्यांनी थेट राणा यांच्या अंगावर खुर्च्या फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

या सभेत झालेल्या राड्याचा व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओत काही कार्यकर्त्यांनी थेट नवणीत राणांच्या (Navneet Rana) दिशेने खुर्च्या फेकल्याचं दिसत आहे. या घटनेत नवनीत राणा थोडक्यात बचावल्या आहेत.

राड्यानंतर नवनीत राणा यांनी खल्लार पोलिस (Police) स्टेशनमध्ये जाऊन घटनेचा व्हिडीओ पोलिसांना दाखवत तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री माजी खासदार नवनीत राणा या दर्यापूर मतदारसंघातील ( Daryapur Assembly Constituency) खल्लार या गावात युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले यांच्या प्रचारासाठी आल्या होत्या.

Navneet Rana Rally Rada
Kiren Rijiju : 'संविधान मसुदा समितीतून आंबेडकरांनी राजीनामा का दिला होता?' किरेन रिजिजूंनी काँग्रेसला घेरले

यावेळी दोन गटात जोरदार हाणामारी आणि धक्काबुक्की झाली. यावेळी जमावाने घोषणाबाजी देखील केली. तर अचानक जमाव आक्रमक झाल्यामुळे दोन्ही गट एकमेकांना भिडले आणि सभास्थळी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

Navneet Rana Rally Rada
Maharashtra Assembly Elections 2024 LIVE updates : आमचे हिंदूत्व चूल पेटवणारे - उद्धव ठाकरे

दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि कार्यकर्त्यांना पांगवलं. या राड्यात अनेकजण जखमी झाले आहेत. तर सध्या खल्लार गावात तणावपूर्ण शांतता असल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com