Hingoli Lok sabha Election 2024: भाजपच्या आमदाराचा दावा हेमंत पाटलांनी फेटाळला; हिंगोलीची जागा शिवसेनेचीच...

Hingoli Loksabha Election 2024 Hemant Patil ON Tanaji Mutkule: शिवसेनेच्या ज्या 12 जागा होत्या त्या जागा शिवसेनेला देण्याचा शब्द शाह यांनी दिला होता. त्यामुळे हिंगोलीची जागा शिवसेनेची असून ही जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे.
Hemant Patil, Tanaji Mutkule
Hemant Patil, Tanaji MutkuleSarkarnama
Published on
Updated on

Hingoli News: लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता आहे. सर्वच पक्षांकडून निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. जागा वाटपाबाबत सर्वच पक्षाची मित्रपक्षासोबत चर्चा सुरू आहे. हिंगोली लोकसभेच्या जागेवर भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी दावा केला आहे. त्यावर विद्यमान खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली.

हेमंत पाटलांनी तानाजी मुटकुळे यांचा दावा फेटाळला आहे. "तानाजी मुटकुळे हे माझे चांगले सहकारी मित्र आहेत. प्रत्येक पक्षाला संघटन वाढवण्याचा अधिकार आहे. निवडणुकीमध्ये प्रत्येकाला पक्षाला आपला उमेदवार निवडून यावा अस वाटत असतं. ही जागा पूर्वीपासून शिवसेनेची आहे,"

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"ज्या वेळेस शिवसेनेचे 12 खासदारानी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. शिवसेनेच्या ज्या 12 जागा होत्या त्या जागा शिवसेनेला देण्याचा शब्द शाह यांनी दिला होता. त्यामुळे हिंगोलीची जागा शिवसेनेची असून ही जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे. मुटकुळे यांना जागा मागण्याचा अधिकार आहे. पण जे काही निर्णय घेतील ते पक्षश्रेष्ठी घेतील आणि तो आम्हाला मान्य असेल," असे हेमंत पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला पाठिंबा देणारे मराठवाड्यातील एकमेव खासदार आहेत. हिंगोली लोकसभा मतदारसंघ शिवसेना-भाजप युती असताना शिवसेनेकडे होता. त्यामुळे शिवसेना उबाठा गटाकडून आग्रही मागणी करण्यात येत आहे. दलित मुस्लिम मतदारांचे मते मिळवणारी वंचित बहुजन आघाडी(Vanchit Bahujan Alliance) शिवसेना उबाठा गटासोबत आहे. महाविकास आघाडीकडून हिंगोली लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला मिळण्याचे संकेत आहेत.

Hemant Patil, Tanaji Mutkule
MP Amol Kolhe: 'पद असताना माज नको! पद गेल्यावर लाज नको'; आढळराव राष्ट्रवादीकडून लढणार? अमोल कोल्हेंचा चिमटा

हिंदुत्वाचा आक्रमक चेहरा म्हणून हेमंत पाटील हे ओळखले जातात.विद्यमान खासदारांना त्यांच्या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीची तयारी करण्याचे पक्षाकडून सांगण्यात आलेले आहे. 2019 च्या तुलनेत 2024 च्या निवडणुकीला सामोरे जाताना राजकीय समीकरणे बदलली आहेत. हेमंत पाटील यांचे शिवसेनेतील एकेकाळचे सहकारी असलेले सुभाष वानखेडे हे स्वगृही परतले आहेत. शिवसेना उबाठा गटाकडून ते प्रमुख दावेदार आहेत. माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा हेसुद्धा इच्छुकांच्या यादीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com