MP Amol Kolhe: 'पद असताना माज नको! पद गेल्यावर लाज नको'; आढळराव राष्ट्रवादीकडून लढणार? अमोल कोल्हेंचा चिमटा

Shirur Lok Sabha Constituency 2024 MP Amol Kolhe On Shivajirao Adhalarao Patil: एकनाथ शिंदे यांनी ठरवलं तर आणि राष्ट्रवादीने मनावर घेतलं तर शिरूर लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेसमधून लढण्याबाबत सूचक विधान आढळरावांनी केले आहे.
Amol Kolhe, Shivajirao Adhalarao Patil
Amol Kolhe, Shivajirao Adhalarao PatilSarkarnama
Published on
Updated on

Shirur News: शरद पवार आणि अजित पवार यांनी शिरूर लोकसभेची (Shirur Lok Sabha Constituency 2024) जागा प्रतिष्ठेची केली आहे. युती आणि आघाडीमध्ये येथे लढत होईल, हे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) हे उमेदवार असणार आहेत.

मात्र, युतीत ही जागा शिवसेना की राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार याबाबतचा तिढा अद्याप सुटलेला नाही. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी शिरूरमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे.(Latest Marathi News)

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांच्या निवासस्थानी नुकतीच बैठक झाली. आढळरावांनी शिरूरमधून लढण्याबाबत कार्यकर्ते आग्रही आहेत.

पक्ष कुठलाही असो खासदार करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता काम करणार आहे, असे एकमत बैठकीत झाले. त्यामुळे शिरूरच्या मैदानात अमोल कोल्हे यांच्या समोर आढळरावांचं आव्हान उभं करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठरवलं, तर आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मनावर घेतलं तर शिरूर लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेसमधून लढण्याबाबत सूचक विधान आढळरावांनी केले आहे.

दुसरीकडे शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीची ताकद असताना उमेदवार निश्चिती होत नसून इतर पक्षांतून उमेदवारांची अदलाबदल करून उमेदवार आयात करावे लागत असतील, तर हीच माझ्या कामाची पावती असल्याचे म्हणत आढळरावांच्या राष्ट्रवादीमधून उमेदवारीवर कोल्हे यांनी निशाणा साधला आहे.

Amol Kolhe, Shivajirao Adhalarao Patil
Ajit Pawar News: भाजप, शिवसेनेसोबत का गेलो? अजितदादांनी सांगितलं कारण...कुणाच्या पाठीत खंजीर खुपसणं...

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार (Ajit Pawar) हे युतीतील तिन्ही पक्षांचे नेते शिरूरचा निर्णय घेणार आहेत. गेल्या लोकसभेला कोल्हे हे शिवसेनेतून राष्ट्रवादीत येऊन खासदार झाले, तसे या वेळी तुम्ही शिवसेनेतून राष्ट्रवादीत जाणार का? असे विचारले असता निवडणूक आहे, काही सांगता येत नाही, तसं होऊ शकतं, असे उत्तर देत आढळरावांनी जणू काही घरवापसीचेच संकेत दिले आहेत.

कोल्हेंकडून राष्ट्रवादींच्या नेत्यांना जुन्या विरोधाची आठवण...

आढळरावांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत अनेक शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. इतकी वर्षे एकमेकांशी संघर्ष केला, त्यांच्यात आता मनोमिलन होणार का, कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानाचा आदर राखला जाणार का?

असे अनेक प्रश्न उपस्थित करीत कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना जुन्या विरोधाची आठवण करून दिली. 'पद असताना माज नको..! पद गेल्यावर लाज नको' जनता सूज्ञ आहे. पाच वर्षांपूर्वी याच मतदारसंघातून लढण्यासाठी उमेदवार नाही असे सांगणाऱ्यांनाच आता त्यांच्यासाठीच उमेदवारीसाठी पक्षांतर करावं लागणार, असं सूचक विधान खासदार कोल्हे यांनी केले आहे.

R

Amol Kolhe, Shivajirao Adhalarao Patil
Aditya Thackeray Vs Eknath Shinde: अमावस्या, पौर्णिमेला मुख्यमंत्री शेती करायला जातात; ठाकरेंनी उडवली खिल्ली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com