Chhatrapati sambhajinagar : देशाच्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी महापालिका क्षेत्रात चिकन-मटणची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश अनेक महापालिका आयुक्तांनी काढला आहे. या निर्णयामुळे आता राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.
स्वातंत्र्य दिनीच सरकार जनतेच्या स्वातंत्र्यावर घाला घालत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मात्र, कल्याण-डोंबिवलीसह नाशिक, मालेगाव, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, इचलकरंजी या महापालिकांनीही चिकन-मटण विक्री बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेने 15 ऑगस्ट रोजी कत्तलखानेही बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे खाटीक समाज आक्रमक झाला आहे. यावरूनच आता एमआयएमचे संभाजीनगरमधील नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महानगरपालिका आयुक्तांना चिकन बिर्याणी आणि मटण कोरमा पार्टीचं निमंत्रण दिलं आहे.
याबाबत त्यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी पालिकेच्या मांसबंदीच्या निर्णयावर टीका केली आहे. शिवाय अद्याप या लोकांना आणि सरकारला स्वातंत्र्याचा अर्थ कळाला नसल्याची टीका देखील त्यांनी केली आहे.
जलील यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 15 ऑगस्ट रोजी सर्व मांस आणि चिकन दुकाने बंद ठेवण्याचे तुघलकी आदेश देणाऱ्या सर्व महानगरपालिका आयुक्तांना 15 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता माझ्या निवासस्थानी आयोजित करण्यात येणाऱ्या चिकन बिर्याणी आणि मटण कोरमा पार्टीत सामील होण्यासाठी निमंत्रण.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. (भारत हा एक स्वतंत्र आणि लोकशाही देश आहे आणि महाराष्ट्र हे हुकूमशहा शासित राज्य नाही). ज्यांना अद्याप स्वातंत्र्याचा अर्थ समजलेला नाही त्यांना आठवण करून देण्यासाठी ही पार्टी आयोजित केली जात आहे, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.