Jalna MP Kalyan Kale issues a privilege notice to the CEO Ankit
Jalna MP Kalyan Kale issues a privilege notice to the CEO Ankitsarkarnama

Kalya Kale : संभाजीनगर जिल्हा परिषदेचे CEO अडचणीत : खासदार कल्याण काळेंनी पाठवली हक्कभंगाची नोटीस

Jalna Kalyan Kale Notice : फुलंब्रीतील मनरेगा ‘मातोश्री पानंद रस्ता’ कामात 5.18 कोटींचा घोटाळा उघड असूनही कारवाई न झाल्याने खासदार कल्याण काळे यांनी जिल्हा परिषद CEO यांना हक्कभंगाची नोटीस दिली आहे.
Published on

Congress News : काँग्रेसचे जालन्याचे खासदार डाॅ. कल्याण काळे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांना हक्कभंगाची नोटीस दिली आहे. लोकप्रतिनिधींनी विचारलेली माहिती न देणे, पत्राला प्रतिसाद न देणे यासह अनेक तक्रारी काळे यांनी या नोटीसीतून केल्या आहेत.

मतदारसंघातील फुलंब्री तालुक्यात मनरेगा योजनेतील 'मातोश्री पानंद रस्ते' कामात तब्बल पाच कोटी 18 लाखांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. परंतु या संदर्भात मागितलेली माहिती सीईओंकडून देण्यात आली नाही, तसेच या घोटाळ्यातील दोषींवर कुठलीच कारवाई करण्यात आले नसल्याचे काळे यांनी या नोटीसीत म्हटले आहे.

तालुक्यात मनरेगा योजनेंतर्गत 'मातोश्री पानंद रस्ते'कामांमध्ये तब्बल 5 कोटी 18 लाख रुपयांच्या अनियमितता झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. तसा अहवाल असताना दोषींवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याबद्दल खासदार कल्याण काळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. तसेच खासदारांच्या पत्राला कुठलाही प्रतिसाद दिला नाही म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हक्कभंगाची नोटीस काळे यांनी दिली आहे.

Jalna MP Kalyan Kale issues a privilege notice to the CEO Ankit
MP Kalyan Kale : खासदार कल्याण काळे म्हणाले, मला रावसाहेब दानवे यांच्याकडून 'एक' गोष्ट शिकावी लागेल!

रोहयोतील घोटाळा व अनियमित प्रकरण जुलै 2025 मध्ये उघड केले होते. एकाच मजुरांच्या ग्रुप फोटोचा वारंवार वापर करून बनावट मजुरी बिले काढल्याचे चौकशी समितीनेही निष्पन्न केले आहे. संबंधित रोजगार सेवक, तांत्रिक सहाय्यक व संगणक चालकांची जबाबदारी निश्चित असूनही कारवाई मात्र अद्याप झालेली नाही. शासन निधीची वसुली प्रक्रिया देखील सुरु न झाल्याने प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचे खासदारांनी पत्रात नमूद केले आहे.

Jalna MP Kalyan Kale issues a privilege notice to the CEO Ankit
राजकीय वाद संपला, लोणीकर आणि दानवे यांच्यात दिलजमाई, Babanrao Lonikar, Ravsaheb Danve, Jalna News

खासदार काळे यांनी 30 ऑक्टोबर 2025 रोजी आपल्या कार्यालयास पत्र दिले होते. त्यावर पोच वा उत्तर न देणे, आवश्यक माहिती न पुरविणे ही लोकप्रतिनिधींचा अवमान करणारी व लोकशाही मूल्यांना बाधा आणणारी बाब असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. शासन व भारत सरकारच्या परिपत्रकांनुसार लोकप्रतिनिधींशी सौजन्यपूर्ण वागणूक आणि पत्रांना त्वरित उत्तर देणे बंधनकारक असल्याची आठवण नोटीसीत करून देण्यात आली आहे.

खासदारांनी 48 तासांत लेखी खुलासा देण्याचे निर्देश दिले आहेत. अन्यथा विशेष हक्कभंग समितीकडे प्रस्ताव सादर करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. त्यामुळे खासदार डॉ.कल्याण काळे आता खरचं कार्यकारी अधिकारी अंकित यांच्यावर हक्काभंग आणणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com