Mahavikas Aghadi: हिंसाचारानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची तोफ धडाडणार: भाजपचीही सावरकर गौरव यात्रा

रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचारानंतर राज छत्रपती संभाजीनगरचे वातावरण ढवळून निघाले होते.
Mahavikas Aghadi:
Mahavikas Aghadi:

Maha VikasAghadi : रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचारानंतर राज छत्रपती संभाजीनगरचे वातावरण ढवळून निघाले होते. त्यानंतर आज (२ एप्रिल) संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) जाहीर सभा होणार आहे.शहरातील सांस्कृतिक मंडळ मैदानावर सायंकाळी सहा वाजता ही सभा होणार आहे. संभाजीनगरच्या किराड भागात नुकत्याच झालेल्या तणावग्रस्त वातावरणानंतर महाविकास आघाडीची ही पहिलीच सभा होत आहे. त्यामुळे या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे.

संभाजीनगरमधील तणावग्रस्त वातावरण पाहता पोलीस या सभेला परवानगी देतील की नाही, याबाबत अनेक शंका होत्या. पण पोलिसांनी काही अटीशर्थींवर महाविकास आघाडीच्या सभेला परवानगी दिली आहे. पोलीस प्रशासनही काही गैरप्रकार घडू नये यासाठी सतर्क झाले आहे. सभेच्या ठिकाणी शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Mahavikas Aghadi:
Jitendra Awhad News : संविधानाची प्रत हाती घेऊन केला काळाराम मंदिरात प्रवेश!

तसेच, कार्यक्रमाच्या वेळेत आणि ठिकाणात कोणताहीबदल करु नये, कार्यक्रमाच्या वेळी कोणत्याही प्रकारे कोणताही रस्ता वाहतुकीसाठी बंद करु नये. वाहतुक सुरुळीतपणे सुरु राहण्याची दक्षता घ्यावी. सभेत सामील झालेल्या नागरिकांनी स्वंयशिस्त पाळावी, येताना-जाताना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करु नये,याची खबरदारी घ्यावी, अशा काही अटीशर्थींवर सभेला पोलिसांनी परवानगी दिल्याची माहिती आहे.

आजच्या या सभेला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह आघाडीचे नेते पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. दरम्यान, रामनवमीला झालेल्या हिंसाचारानंतर छत्रपती संभाजीनगरमधील तणावग्रस्त वातावरण झाले होते. यावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले. यावरुन राजकी वातावरणही चांगचल तापलं होते. त्यामुळे आजच्या या महाविकास आघाडीच्या सभेत महाविकास आघाडीचे आज काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Mahavikas Aghadi:
Nashik News: जिल्हा परिषदेतील दोषी अधिकाऱ्यांवर वचक हवा!

एकीकडे महाविकास आघाडीची सभा होणार आहे. तर दुसरीकडे शहरात आज (२ एप्रिल) भाजपची आणि शिंदे गटाची शिवसेनेतर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. शहरातील पश्चिम, पूर्व आणि मध्य विधानसभा मतदारसंघात भाजप ही यात्रा काढणार आहे. यावेळी दोन्ही पक्षातील कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात या यात्रेत सहभागी होऊ शकतात. त्यामुळे एकाच दिवशी भाजप आणि महाविकास आघाडी आज पुन्हा आमनेसामने येणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com