
Maharashtra language politics : त्रिभाषा सूत्रानुसार राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा विषय सक्ती करण्याचा महायुती सरकारच्या निर्णयाला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र विरोध केला असून, त्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक माजी मंत्री बच्चू कडू हे मनसेच्या विरोधावर कडाडले असून, राज ठाकरे ठरवणारे कोण? असा सवाल केला आहे.
बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आमदार, "खासदार, अधिकाऱ्यांची पोरं दहा-दहा भाषा शिकतात. गरिबाच्या पोराला शिकवण्यासाठी काय अडचण आहे? तो त्यांच्या पालकांचा विषय आहे, त्यांनी पाल्याला काय शिकवायचे अन् काय नाही ते!" भाषा शिकल्याने मराठी अस्मिता जाती, असं काही नाही. आम्ही नेहमी मराठी भाषा वापरली पाहिजे, याच्याबद्दल दुमत नाही, असंही बच्चू कडू यांनी म्हटले.
मनसेने (MNS) महाराष्ट्रातील व्यावसायिक दुकानदारांच्या पाट्या या मराठी पाहिजे, अशी भूमिका घेतली होती. अर्थात, सर्वोच्च न्यायालयाचा यासाठी मोठा संदर्भ आहे. त्यावर बच्चू कडू यांनी पाट्या मराठीत लावल्या पाहिजेत, त्याबद्दल दुमत नाही. पण काय शिकावं हे राज ठाकरे कसं काय ठरवणार, असा सवाल केला.
शाळेत जर्मनी भाषा शिकली म्हणून त्याचं कौतुक होते. पण हिंदी शिकवते म्हणून त्याच्यावर तुम्ही प्रश्न निर्माण करत असाल, तर हे चुकीच आहे. हिंदीला राष्ट्रीय भाषा म्हणून घोषित केले पाहिजे, आम्ही जेव्हा महाराष्ट्रात आहे, तेव्हा मराठी आहे, असे सांगून देशाला एक नाव नाही, भारत वेगळा, इंडिया वेगळा, हिंदुस्तान वेगळा, काय प्रकार लावलाय? याकडे बच्चू कडू यांनी लक्ष वेधले.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोलताना, बच्चू कडू यांनी कर्जमाफीचा विषय हा मुख्यमंत्र्याकडे घेऊन जाणार आहोत, असे सांगितले. आम्ही कर्जमाफीच्या बाजूने आहोत, कर्जमाफी झाली पाहिजे, अशी मानसिकता आहे, असं मंत्री माणिकराव कोकाटे म्हणत आहेत, मग घोड अडलं कुठे? असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला.
तुम्ही घोषणा केल्यामुळे लोकांनी कर्ज भरलं नाही, त्यामुळे व्याज माफ झालं नाही. आता नवीन कर्ज शेतकऱ्यांना मिळत नाही, शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. तुम्ही घोषणा केली नसती, तर त्यांनी कर्ज भरलं असतं, तुम्ही घोषणा केल्यामुळे ते आता कर्ज भरत नाहीत. आम्ही कर्जमाफी झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, यासाठी काही झालं तरी बहेत्तर, असा इशारा बच्चू कडू यांनी महायुती सरकारला दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.