Ajit Navle Politics: हिंदीची सक्ती हा तर भाजपचा द्वेषमूलक, विभाजनवादी अजेंडा!

Ajit Navle; Hindi language compulsion is attack on Maharashtra`s culture and pride-हिंदी सक्तीचा निर्णय हा मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमान, ; हल्ला आहे.
Ajit Navle, CPM leader
Ajit Navle, CPM leaderSarkarnama
Published on
Updated on

Ajit Navle News: महाराष्ट्रात पहिलीपासून पाचवीपर्यंत मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी सक्तीची करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावर राज्यभरातून अतिशय तीव्र प्रतिक्रीया उमटल्या आहेत. हा निर्णय म्हणजे, मराठी भाषा, महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीवर हल्ला असल्याची टिका होत आहे.

राज्य शासनाने पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे समर्थन केले आहे. मनसे नेते राज ठाकरे, शिवसेना तसेच अन्य पक्षांनी त्याचा विरोध केला आहे. आता त्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने देखील लाल निशान फडकावले आहे.

Ajit Navle, CPM leader
BJP Politics: भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस कार्यालयावर हल्लाबोल, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड!

यासंदर्भात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अजित नवले शासनाला इशारा दिला आहे. हिंदी भाषे बद्दल व इतर सर्वच भाषांबद्दल आम्हाला आदरच आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये मराठी सोडून इतर कोणत्याही भाषेची सक्ती करणं अयोग्य आहे. हिंदी बाबत करण्यात आलेली सक्ती सरकारने तातडीने मागे घ्यावी.

Ajit Navle, CPM leader
Aaditya Thackrey Politics: लाडकी बहिण योजना रद्द होणार?, आदित्य ठाकरे यांनी सांगितला भाजपचा 'तो' प्लॅन!

ते म्हणाले, एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा. दुसरीकडे महाराष्ट्रात हिंदी भाषा पहिलीपासून विद्यार्थ्यांना अनिवार्य करायची. हे केवळ संतापजनक नसून निषेधार्हही आहे. यामागे मराठी विद्यार्थ्यांना एका वेगळ्या कारस्थानात ढकलण्यासारखे आहे.

भाजप याद्वारे आपला द्वेषमूलक, मतदान केंद्री व विभाजनवादी अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न करत आहे. मराठी भाषा व मराठी संस्कृती कमजोर केल्याशिवाय देशाच्या काही भागात ज्या प्रकारचे राजकारण आहे, त्या प्रकारचे असहिष्णू, द्वेषमूलक राजकारण या महाराष्ट्राच्या मातीत रुजणार नाही. याची जाणीव असल्यामुळेच भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून हिंदी भाषेच्या सक्तीची खेळी खेळली गेली आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने या निर्णयाचा मुहूर्त निश्चित केलेला दिसतो आहे. मुंबई मधील मराठी भाषिकांना जाती धर्मांमध्ये आपसात झुंजवत ठेवायचे व दुसऱ्या बाजूला उत्तर भारतीय मते हिंदी भाषेच्या आधारे आपल्याकडे वळवायची हा भारतीय जनता पक्षाचा यामागे डाव आहे, असा आरोप नवले यांनी केला.

सरकारने पहिलीपासून हिंदी सक्तीची करण्याचा आपला निर्णय या पार्श्वभूमीवर तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली. जनतेची भावना व न्याय लक्षात घेऊन सक्ती मागे न घेतल्यास या विरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा, डॉ. अजित नवले यांनी दिला.

-------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com