Mahavikas Aghadi News : महायुतीचा तीस जागा जिंकण्याचा दावा, महाविकास आघाडीचा आकडा किती ?

Mahayuti's figures came out, how many seats will Mahavikas Aghadi claim to win? छ गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना 12 तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी 8 असे 16 आमदार निवडून आले होते. मराठा-ओबीसी आरक्षण, राज्यातील कायदा व सुव्यवस्था, महिलांवरील अत्याचार यावरून सत्ताधारी महायुतीच्या विरोधात वातावरण होते.
Mahavikas Aghadi
Mahavikas AghadiSarkarnama
Published on
Updated on

Mahavikas Aghadi Marathwada News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्रपती संभाजीनगरात मराठवाड्यातील 46 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी नुकतीच बैठक घेतली. यावेळी 46 पैकी 30 जागा जिंकण्याचा दावा शहा यांनी केला. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आठ पैकी केवळ एक जागा जिंकल्यानंतर शहा यांचा काॅन्फिडंस पाहून अनेकांच्या भुवया उंचवाल्या गेल्या. तर ज्या महाविकास आघाडीने सात लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला ती काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी मराठवाड्यात विधानसभेच्या किती जागा जिंकणार? त्यांचा आकडा किती? याची उत्सूकता सगळ्याना लागली आहे.

Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi : काँग्रेस अन्‌ ठाकरेंच्या शिवसेनेकडून पवारांच्या राष्ट्रवादीला चॅलेंज; चंदगडमध्ये आघाडीत बिघाडी?

अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार या महायुतीच्या राज्यातील प्रमुख नेत्यांनी संभाजीनगरातील बैठकीत सहभागी होत एक प्रकारे विधानसभा निवडणुकीचे रणशिंगच फुंकले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही पुढील दोन महिने महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन केल्याशिवाय थांबणार नाही, असे स्पष्ट करत जोरदार तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. मात्र महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेसच्या गोटात अद्याप फारशा हालचाली दिसत नाहीत.

लोकसभा निवडणुकीत मराठवाड्याने महाविकास आघाडीला भरभरून दिले. छत्रपती संभाजीनगरची जागा वगळता सातही लोकसभा मतदारसंघात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाला यश मिळाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने परभणी, हिंगोली, धाराशीव, काँग्रेसने जालना, नांदेड, लातूर तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बीड लोकसभेची जागा जिंकत मराठवाड्यात जोरदार मुसंडी मारली.

Mahavikas Aghadi
Mahayuti News : नवरात्रीच्या मुहूर्तावर महायुती मोठा धमाका करणार; उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार, पण...

2019 च्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर मराठवाड्यातील 46 पैकी 28 जागा शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षाने जिंकल्या होत्या. अर्थात तेव्हा शिवसेना-भाजप तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होती. (Mahayuti) आता शिवसेना-राष्ट्रवादीत फूट पडली आहे, तर काँग्रेस लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून महाविकास आघाडीत मोठा पक्ष ठरला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना 12 तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी 8 असे 16 आमदार निवडून आले होते.

मराठा-ओबीसी आरक्षण, राज्यातील कायदा व सुव्यवस्था, महिलांवरील अत्याचार यावरून सत्ताधारी महायुतीच्या विरोधात वातावरण होते. महाविकास आघाडीला लोकसभेला याचा फायदा झाला. विधानसभा निवडणुकीत लोकसभेप्रमाणेच मतदारांचा कल राहील, असा आघाडीच्या नेत्यांचा अंदाज आहे. महायुतीने मात्र लोकसभा निवडणुकीतील चित्र बदलण्याच्या दृष्टीने वेगवान हालचाली मराठवाड्यात व राज्यात सुरू केल्या आहेत.

Mahavikas Aghadi
Amit Shah In Marathwada News : भाजपचे विमान जमीनीवर, विधानसभेसाठी जागांचे टार्गेट घटवले

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील अडीच कोटी महिलांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. एक कोटी 60 लाख महिलांना लाडकी बहीण योजनाचा लाभ मिळाला आहे. याशिवाय इतर योजनांमुळे विधानसभेला मतदार महायुतीला पसंती देतील, या आशेवरच भाजप नेत्यांकडून मराठवाड्यात तीस जागा जिंकण्याचा दावा केला जातोय.

तर महाविकास आघाडीला मात्र राज्यातील जनतेचा मूड अजूनही महायुतीच्या विरोधातच असल्याचे दिसते. जागा वाटपात तानातानी होऊ न देता समन्वयाने, बंडखोरी होणार नाही याची काळजी घेत चर्चा सुरू असल्याचे काँग्रेसचे नेते सांगत आहेत. महायुतीने 30 जागांवर दावा केल्यानंतर महाविकास आघाडीचा आकडा किती ? याची चर्चा आता सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com