Amit Shah In Marathwada News : भाजपचे विमान जमीनीवर, विधानसभेसाठी जागांचे टार्गेट घटवले

BJP's cautious move to the Legislative Assembly after the defeat in the Lok Sabha : `भाजपने मिशन 45` चे उदिष्ट हाती घेतले होते, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने तर विरोधकांना एकही जागा मिळू द्यायची नाही, असा चंग बांधत `मिशन 48` चे टार्गेट ठेवले होते.
Amit Shah
Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

BJP Marathwada Political News : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीची रणनिती आखण्यासाठी भाजपचे चाणक्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल छत्रपती संभाजीनगरात आले होते. राज्यासह मराठवाड्यातील प्रमुख नेत्यासह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष या बैठकीला उपस्थितीत होते. मराठवाडा आपलाच असा दावा अमित शहा यांनी पदाधिकारी मेळाव्यात केला खरा, पण लोकसभेला 48 पैकी 45 जागांचे मिशन हाती घेणाऱ्या भाजपने विधानसभेसाठीचे आपले टार्गेट मात्र घटवले.

लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील आठ पैकी सात मतदारसंघ गमावल्यानंतर मानसिकदृष्ट्या खचलेल्या भाजप (BJP) कार्यकर्त्यांमध्ये उर्जा भरण्याचे काम अमित शहा आणि भाजपच्या नेत्यांनी केले. पण त्यासोबतच विधानसभेला अंगलट येतील असे दावे करण्याचा मोह टाळला. निवडणुका जिंकण्याचा अमित शहा यांचा फाॅर्म्युला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात फोल ठरला. मराठवाड्यात मराठा आरक्षण आणि त्यावरून ओबीसी विरुद्ध मराठा या संघर्षाने महायुतीला आस्मान दाखवले.

छत्रपती संभाजीनगर लोकसभेची एकमेव जागा ती ही शिवसेनेने जिंकली. भाजपची पाटी मराठवाड्यात कोरीच आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही, ओबीसी, धनगर आरक्षणाच्या प्रश्नानेही तोंड वर काढले आहे. अशा परिस्थितीही अमित शहा यांनी मराठवाडा आपलाच आहे, असा दावा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महायुती-महाविकास आघाडीतील कुठल्याही पक्षापेक्षा मराठवाड्यात भाजपची संघटनात्मक बांधणी मजबुत आहे, हे कोणीही नाकारू शकणार नाही.

Amit Shah
BJP Politics : भाजपचं ठरलं! विधानसभा निवडणूक 'या' नेत्यांच्या सामूहिक नेतृत्वात लढवणार?

पण लोकसभा निवडणुकीने ही बांधणी झुगारून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान केले होते. आंदोलनाची फारशी काळजी करायची नाही, ती होतच असतात असे सांगत अमित शहा (Amit Shah) यांनी एकप्रकारे मराठा आरक्षण आंदोलनाला आपण फार महत्व देत नाही हे दाखवून दिले. आंदोलनाचा निवडणुकीवर परिणाम होत नसतो, त्याचे काय करायचे ते फडणवीस, बावनकुळे सांभाळून घेतील, असे सांगत शहा यांनी भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये विश्वास आणि नव्याने लढण्याची उमेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

लोकसभा निवडणुकीत अमित शहा यांच्या मराठवाड्यात व राज्यात ज्या ज्या भागात सभा झाल्या त्यावर नजर टाकली तर अशीच भाषा त्यावेळी शहा यांनी वापरली होती. पण मराठा आरक्षणासारख्या ज्वलंत विषयाने भाजपसह महायुतीला दणका दिला. `भाजपने मिशन 45` चे उदिष्ट हाती घेतले होते, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने तर विरोधकांना एकही जागा मिळू द्यायची नाही, असा चंग बांधत `मिशन 48` चे टार्गेट ठेवले होते.

Amit Shah
Amit Shah : पेटतं मराठा आंदोलन अन् विधानसभेचं मैदान, कसा मार्ग काढणार? अमित शहांनी सांगितली 'स्ट्रॅटर्जी'

पण मराठवाडा आणि राज्यातील राजकीय वातावरण असे काही बदलले की, आधी होत्या त्या जागा राखतांना महायुतीची दमछाक झाली. मराठवाडा आपला म्हणणाऱ्या भाजपचे तर दिग्गज नेते पराभूत झाले. अर्थात चांगली किंवा वाईट राजकीय परिस्थिती कायम राहत नसते. विधानसभा निवडणुकीत लोकसभेचे चित्र कायम राहणार नाही, असा विश्वास अमित शहा यांच्यासह भाजपच्या सर्वच नेत्यांनी व्यक्त केला.

महायुतीची मदार `लाडकी बहीण` वरच..

लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खालल्यानंतर महायुतीच्या सरकारने राज्यात विविध लोकप्रिय आणि थेट मतदारांना आर्थिक फायदा मिळवून देणाऱ्या योजना आणल्या. त्यापैकीच एक आणि सर्वात मोठी योजना म्हणजे `मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण` योजना. 46 हजार कोटींची तरतूद असलेल्या या योजनेसाठी रेकाॅर्डब्रेक नोंदणी करून घेतल्यानंतर दोन महिन्याचे मिळून प्रत्येकी तीन हजार रुपये पात्र लाडक्या बहीणींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

Amit Shah
Mahayuti News : महायुती एकत्र लढणार की नाही? अमित शहांनी स्पष्टचं सांगितलं

तर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापुर्वी तिसरा हप्ता जमा करण्याच्या हालचाली सुरू आहेत. याशिवाय वृद्ध, खेळाडू, बेरोजगार तरूण, विद्यार्थी यांच्यासाठी अनेक योजना राबवत सरकारने मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न केले आहेत. मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारविरोधात पेटलेले रान जनतेसाठी राबवल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनेच्या जोरावर शांत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

अमित शहा यांनी सरकारी योजनेच्या लाभार्थ्यांशी संपर्क वाढवा आता आपल्याला त्यांची गरज असल्याचे जाहीरपणे सांगितले. एकूणच लाडकी बहीण सारख्या विविध योजनांवरच विधानसभा निवडणुकीचे आव्हान महायुती पेलण्याच्या तयारीत आहे. अमित शहा यांनी बुथ मजबुत करण्यावर आपल्या भाषणात जोर दिला होता. प्रत्येक बुथवर 30 अतिरिक्त मते मिळवली तर आपला विजय निश्चित असल्याचे गणित त्यांनी पदाधिकाऱ्यांना समजावून सांगितले.

Amit Shah
Shivsena v/s BJP News : आमदार ज्ञानराज चौगुलेंची डोकेदुखी वाढणार ; भाजपचा इच्छुक मैदानात

ज्या बुथवर आपण पहिल्या क्रमांकावर आहोत, त्यावरही लक्ष ठेवाच, पण जिथे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आपण आहोत, त्या बुथच्या विरोधी पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करा, असा कानमंत्रही अमित शहा यांनी दिला. शहा यांनी भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये हवा भरण्याचे काम केले आहे, आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात त्याचा किती परिणाम होतो, मराठवाडा आपलाच हा अमित शहा यांचा शब्द महायुतीचे कार्यकर्ते खरा करून दाखवतात का? हे लवकरच स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com