
Pankaja munde latest news update
परळी : भाजपच्या (BJP) राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनाचे स्मरण करत फेसबुक पोस्टद्वारे एक भावनिक आवाहन केले आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे स्मृतीस्थळ असलेल्या गोपीनाथ गडाचा फोटो सर्वांनी आपल्या प्रोफाईलवर ३ जून पर्यंत ठेवण्याचं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे. तसेच, २६ मे ते ३ जून असा आपल्या अपेक्षांचा प्रवास अनुभवुया, अशी भावनिक सादही त्यांनी फेसबुकपोस्टच्या माध्यमातून घातली.
पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर ' 26 may... संघर्ष आपल्या सर्वांचा आणि आपला विश्वास शपथ घेत होता मोदींजींच्या मंत्री मंडळात... 3 June पर्यंत हे profile ठेवू आणि साहेबांचा 26 may ते 3 June चा आपल्या अपेक्षांचा प्रवास अनुभव करू ....'' असे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे, "संघर्ष की बडी-बडी व्याखाएं कर रहे थे सभी । मैंने पिता लिखकर सब को मौन कर दिया..।'' अशा शब्दांत पंकजा यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या.
परळी सारख्या छोट्या शहरातून देशपातळीवर आपल्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांचा प्रवास थक्क करणारा आहे. आमदार, उपमुख्यमंत्री खासदार असा प्रवास करत शेवटी केंद्रात मंत्रीपद असा गोपीनाथ मुंडेचा प्रवास हा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. 2014 मध्ये भाजपने देशभरात एकहाती बहुमत मिळवत केंद्रात सत्ता स्थापन केली. 26 मे 2014 रोजी गोपीनाथ मुंडे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात ग्रामविकास मंत्रीपदाची शपथ घेतली. पण फक्त आठवड्याभरातच ३ जूनला त्यांचे अपघाती निधन झाले.
त्यामुळेच 26 मे ते 3 जून हा काळ सर्वांच्या चिरकाल स्मरणात राहील. याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडे यांचे समाधीस्थळ असलेल्या गोपीनाथ गडाचा फोटो आपल्या प्रोफाईलवर ठेवण्याचे आवाहन केले आहे. पंकजा मुंडेंच्या या आवाहनाला सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत अनेक लोकांनी गोपीनाथ गडाचा फोटो प्रोफाईलवर ठेवत त्यांच्या आठवणींना सर्वजण उजाळा देत आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.