Ambadas Danve On Shinde-Pawar : अजित पवारांना मुख्यमंत्री अन् शिंदेना अर्थमंत्री करा, दानवेंचा अजब सल्ला..

Shivsena : अजित पवार यांनाच दिल्लीच्या दरबारी मुजरे व हुजरेगिरी करावी लागतेय, यासारखे दुर्दैव नाही
Ambadas Danve- CM Eknath Shinde News
Ambadas Danve- CM Eknath Shinde NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra : लांबलेला मंत्रीमंडळ विस्तार आणि सरकारमध्ये नव्यानेच सरकारमध्ये सामील झालेल्या राष्ट्रवादीचा अर्थ खात्यासाठीचा हट्ट, यावरून सध्या सरकारमध्ये गरमागरमी सुरू आहे. (Ambadas Danve On Shinde-Pawar) अजित पवार यांना अर्थ खाते देण्यास मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या मंत्री, आमदारांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे अजित पवारांनी थेट दिल्ली गाठली.

Ambadas Danve- CM Eknath Shinde News
Eknath Khadse Allegation: गिरीश महाजनांच्या आशीर्वादाने अनेक गुन्हेगार सेटल झाले

या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला अजब सल्ला दिला आहे. (Ajit Pawar) अजित पवारांना मुख्यमंत्री करा आणि एकनाथ शिंदे यांना अर्थ खाते द्या, असा टोला त्यांनी लगावला आहे. अजित पवार यांना मुख्यमंत्री पद द्यावं आणि अर्थमंत्रीपद एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना देऊन हा तिढा सोडवावा असेही दानवे यांनी सुचवले आहे.

भाजपने युती करण्यासाठी शिवसेना (Shivsena) व आता राष्ट्रवादी पक्षातून अनेक नाग गळ्यात अडकवून ठेवले आहेत, ते त्यांना काम करून देणार का ? मंत्रीपद गळ्यात पडेल या आशेने डोळे लावून बसलेल्यांचे शिवलेले कोट कपाटातच राहतील, अस चित्र सध्या दिसत आहे. जे सोबत आले आहेत त्यांना शिंदे-फडणवीस सरकार न्याय देऊ शकले नाहीत मग अपक्षाला न्याय देणं तर लांबच आहे.

अजित पवार हे भाजपच्या दिल्लीवारीवर आधी टीका करत होते आणि आज शालीन नेतृत्व असलेल्या अजित पवार यांनाच दिल्लीच्या दरबारी मुजरे व हुजरेगिरी करावी लागतेय, यासारखे दुर्दैव नाही, अशी टीकाही दानवे यांनी केली. मंत्रीपद त्याग केलं अशी भूमिका आज अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मांडली.

यावर दानवे म्हणाले की, शिंदे-फडणवीस मंत्रिपद घ्या म्हणून मागे लागलेत का, ते देत नाही मग त्याग कसला करताय? या सर्व बनावट गोष्टी आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाचं मुखपत्र असलेल्या वर्तमानपत्राने ठाकरेंवर टीका करण्यापूर्वी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनात गंगेत वाहिलेल्या प्रेतांबाबत जाब विचारावा. पंतप्रधान फंडाबाबत पंतप्रधानांना प्रश्न विचारावे, असेही दानवे यांनी सुनावले.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com