Killari Earthquake : ‘पवारसाहब आप पैसों की चिंता मत करो, मैं वर्ल्ड बॅंकसे बात करूंगा’; मनमोहनसिंगांनी १० दिवसांत दिले कोट्यवधी रुपये

Rehabilitation Fund : मध्यरात्री अडीच-तीन वाजता रस्त्यालगतच्या एका बैलगाडीत एक माणूस झोपलेला दिसला. मी गाडी थांबवून त्या झोपलेल्या माणसाला उठवलं, तेव्हा लक्षात आलं की, ते कलेक्टर होते.
Killari Earthquake
Killari EarthquakeSarkarnama
Published on
Updated on

ीKillari News : 'पवारसाहब आप पैसों की चिंता मत करो. मैं वर्ल्ड बॅंकसे बात करूंगा. आपको जितनी रकम चाहिए, उतना पैसा मैं आपको दूंगा,' असा शब्द त्यावेळचे केंद्रीय अर्थमंत्री डॉ. मनमोहनसिंग यांनी दिला होता. त्यानंतर त्यांनी अवघ्या दहा दिवसांत जागतिक बॅंकेकडून कोट्यवधी रुपयांची रक्कम मंजूर करून महाराष्ट्र सरकारला उपलब्ध करून दिली होती. ‘कमी पडले तर आणखी सांगा. आणखी पैसे देऊ’, असेही त्यांनी म्हटल्याची आठवण ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितली. (Manmohan Singh gave crores of rupees in ten days for the rehabilitation of Killari earthquake victims)

लातूर जिल्ह्यातील किल्लारी आणि परिसरात ता. ३० सप्टेंबर १९९३ रोजी महाप्रलयंकारी भूकंप झाला. त्या घटनेला आज ३० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने लातूर आणि परिसरातील नागरिकांनी पवारांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले हेाते. त्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.

Killari Earthquake
Maharashtra Politics : अजितदादांना आणखी काय हवंय? कारवाया थांबल्या, सत्ताही भेटली; आता ते सहन करावंच लागणार

ते म्हणाले की, ता. ३० सप्टेंबर हा अस्वस्थ करणारा दिवस आहे. सकाळी सहा वाजताच मी किल्लारीत पोचलो होतो. परिस्थिती भयानक होती. घरं पडली होती, जागोजागी मृतदेह दिसत होते. काही लोक कण्हत आहेत, काही जण रडत आहेत. आया बहिणी अस्वस्थ... आयुष्यात असं संकट पाहू नये, असे संकट किल्लारीत पाहिले. आजूबाजूला पाहणी करत फिरताना लक्षात आलं की एकट्या किल्लारीतच नाही तर उमरगा, औसा आणि आजूबाजूलाही मोठे नुकसान झाले होते.

संपूर्ण ताकद पणाला लावल्याशिवाय आपण हे संकट दूर करू शकत नाही, हे ओळखून आजूबाजूच्या जिल्ह्यांतील वरिष्ठ अधिकारी भूकंपस्थळी बोलावून घेतले. डॉक्टर बोलावले आणि सुविधा देण्यासाठी प्रक्रिया सुरू केली. तीन आठवडे किल्लारी व परिसरातील भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या कामाशिवाय दुसरं कोणतंही काम केलं नाही. जवळपास पंधरा दिवस मी इथंच येऊन राहिलो. माझा मुक्काम सोलापूरच्या शासकीय विश्रामृहात असायचा. सकाळी सात वाजता येऊन रात्री दीड ते दोनपर्यंत काम करायचो आणि रात्री मुक्कामाला परत सोलापूरला जायचो, असा त्यावेळचा दिनक्रम पवारांनी सांगितला.

Killari Earthquake
Earthquake@1993 : भूकंपाच्या आठवणींनी ३० वर्षांनंतरही काळजाचा थरकाप उडतो...

पवार म्हणाले की, संकट मोठं होतं, पण येथील जनतेने मोठ्या धैर्याने त्याला तोंड देण्याचे काम केले. विलासराव देशमुख आणि पद्मसिंह पाटील यांच्यावर जबाबदारी दिल्या. त्यांच्यासोबत काही लोक होते. आम्ही सर्वजण मिळून भूकंपग्रस्तांना धीर देण्याचे काम करीत होतो. काही अधिकाऱ्यांची मला आठवण होते. तेव्हा प्रवीण परदेशी नावाचे कलेक्टर होते. त्यावेळी अधिकाऱ्यांनीही अखंडपणे काम केले. एके दिवशी मी रात्री उमरग्याहून रात्री दोन अडीच वाजता लातूरला यायला निघालो. मध्यरात्री अडीच-तीन वाजता रस्त्याच्या कडेला एका बैलगाडीत कोणीतरी माणूस झोपला आहे, हे मला दिसलं. मला वाटलं घरदार गेलेला भूकंपग्रस्त असेल. मी गाडी थांबवून त्याच्याकडं जाऊन झोपलेल्या माणसाला उठवलं, तेव्हा लक्षात आलं की, ते कलेक्टर होते. दिवसभर कष्ट करून शेवटी थकून दोन ते तीन तासांची विश्रांती घेण्यासाठी त्यांनी अंग टाकलं होतं.

Killari Earthquake
Sharad Pawar In Killari : पवारांच्या कृतज्ञता सोहळ्यात सुळेंनी विलासरावांबरोबरच पद्मसिंह पाटलांचीही आठवण काढली

किल्लारी भूकंपाच्या पुनर्वसनाची माहिती मिळावी, यासाठी मला युनो आणि जागतिक बॅंकेकडून बोलावणे आले होते. त्यानुसार मी त्या ठिकाणी जाऊन भूकंप आणि पुनर्वसनाबाबत राबविलेल्या धोरणाबाबत माहिती दिली. त्याचा एक फायदा असा झाला की, भूकंपानंतर पुनर्वसनासाठी कोट्यवधी रुपये लागणार होते. एवढी रक्कम त्यावेळी महाराष्ट्र सरकारकडे नव्हती. पण त्यावेळचे केंद्रीय अर्थमंत्री डॉ. मनमोहनसिंग यांच्यामुळे ते अवघ्या दहा दिवसांत मिळाले, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Killari Earthquake
Killari Earthquake @1993 : आयुष्यात प्रथमच मृत्यूचं तांडव पाहिलं....लोक वेड्यासारखे फिरत होते

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com