Bjp Core Committee : एकनाथ शिंदे अन् अजितदादांबद्दल भाजपच्या बैठकीत मोठा निर्णय

PM Narendra Modi And Amit Shah : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या संदेशाची माहिती प्रभारींनी बैठकीत दिली आहे.
eknath shinde ajit pawar
eknath shinde ajit pawarsarkarnama

लोकसभा निवडणुकीत '45 पार'ची वल्गना करणाऱ्या महायुतीचा गाडा 17 जागांवर थांबला. 2019 मध्ये 23 जागा जिंकणाऱ्या भाजपच्या फक्त 9 जागा निवडून आल्या आहेत. यानंतर महायुतीत शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटावर भाजपचे कार्यकर्ते आणि नेते नाराज असून विधानसभेला स्वबळाची भाषा करण्यात येत आहे.

यातच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं राज्यातील नेत्यांचे कान टोचले आहेत. "स्वबळावर निवडणूक लढविण्याची भाषा करू नका," अशा शब्दांत भाजपचे निवडणूक प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव ( Bhupendra Yadav ) आणि अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी झालेल्या बैठकीत तंबी दिली आहे.

नरिमन पॉइंट येथील प्रदेश कार्यालयात शनिवारी महाराष्ट्र भाजपच्या कोअर ग्रुपची ( Bjp Core Committee ) बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

"महायुती म्हणून विधानसभा निवडणुकीला समोर जा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करणं बंद करून आतापासून निवडणुकीची तयारी सुरू करा. जिल्हास्तराव भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांशी समन्वय साधा," अशा सूचना प्रभारींनी नेत्यांना दिल्या आहेत.

eknath shinde ajit pawar
Ashish Shelar : पंतप्रधान मोदींच्या सभांची शरद पवारांसह आघाडीमधील नेत्यांना वाटतेय भीती; भाजप नेत्याचं मोठं विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या संदेशाची माहिती देताना प्रभारींनी सांगितलं, "विधानसभा निवडणुका देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत. राज्याचे निवडणूक प्रभारी आणि उपमुख्यमंत्री फडणवील हे महायुतीत सहभागी असलेल्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी जागा वाटपाबाबत चर्चा करतील. त्यानंतर त्याची माहिती वरिष्ठ नेतृत्वाला देण्यात येईल."

eknath shinde ajit pawar
Bacchu Kadu : बच्चू कडू म्हणाले, "अजितदादा आता तुम्ही बोलाच..."; विधानसभेत नेमकं काय घडलं?

"भाजपनं स्वबळावर विधानसभा निवडणूक एकट्यानं लढवावी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला महायुतीतून वगळलं पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्यांनी लोकसभेला भाजपच्या उमेदवारांसाठी प्रामाणिक काम केलं नाही. असं कोणतंही वक्तव्य भाजप नेत्यांनी करू नये," अशा सूचना प्रभारींनी दिल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com