Video Manoj Jarange: जरांगे, तुम्ही रडू नका, तुमची आम्हाला गरज आहे, मित्र म्हणून माझे ऐका!

Antarwali Sarati Maratha Reservation Protest Kunbi Certificate News Update:"दादा, तुम्ही तब्येतीकडे लक्ष द्या, मित्र म्हणून माझा ऐका. तुमचे प्रतिनिधी पाठवा, त्यांचे नाव सांगा, आपण बैठक मुख्यमंत्र्यांकडे लावू," असे आश्वासन देसाई यांनी दिले.
Antarwali Sarati Maratha Reservation
Antarwali Sarati Maratha Reservation Sarkarnama

Antarwali Sarati Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यात सरकारला यश आले, जरांगेंनी सरकारला एक महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे.

सरकारकडून मंत्री शंभूराज देसाई, खासदार संदीपान भुमरे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी जरांगे-पाटील (Manoj Jarange) यांची मागणी एका महिन्यात पूर्ण करू, असं आश्वासन देसाई यांनी दिलं.

देसाई-भुमरे यांच्याशी आरक्षणावर (Maratha Arakshan)चर्चा करताना जरांगेंना भावनाविवश झाले. त्यावेळी देसाईंनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. "जरांगे तुम्ही रडू नका , तुमची आम्हाला गरज आहे,' असे देसाई म्हणाले. "दादा, तुम्ही तब्येतीकडे लक्ष द्या, मित्र म्हणून माझा ऐका. तुमचे प्रतिनिधी पाठवा, त्यांचे नाव सांगा, आपण बैठक मुख्यमंत्र्यांकडे लावू," असे आश्वासन देसाई यांनी दिले.

Antarwali Sarati Maratha Reservation
Video Manoj Jarange Update : 'बजरंग बाप्पा'चे 'किंगमेकर' मनोज जरांगेच; बीडमध्ये झळकले बॅनर

सरकारने हे जाणून बुजून षडयंत्र रचले आहे.सरकारने शब्द फिरवला आहे. मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीने नवं षडयंत्र रचले आहे,' असा आरोप जरांगे यांनी केला आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी कधी करणार? असा सवाल त्यांनी भुमरे-देसाई यांना केला. यावेळी देसाईंनी त्यांना शिंदे समितीच्या कामाबाबत त्यांना माहिती दिली.

शंभुराज देसाई म्हणाले, "सगेसोयऱ्यांची अंमलबजावणीसंबंधी सरकारची मानसिकता नाही हे डोक्यातून काढून टाका, शिंदे साहेबांनी त्याचा शब्द दिला आहे. हा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सोडू, त्याला इतरांचा विरोध व्हायला नको. यावर येणाऱ्या हरकती या मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर ठेवल्या जातील.सगळे सोयऱ्यांच्या बाबतीतली ही टेक्निकल प्रोसेस लवकर करू. अधिकाऱ्यांना बोलावतो, किती हरकती आल्या किती छानणी केल्या, किती राहिल्या याचा टाईम बॉण्ड अहवाल जाहीर करू," जरांगेंनी सहाव्यांच्या दिवशी आपले उपोषण मागे घेतले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com