Manoj Jarange Emotional : हिंगोलीत मनोज जरांगे भावूक; मराठा समाजाला केलं मोठं आवाहन, म्हणाले...

Maratha Reservation Shantata Rally : माझ्या घरावर आता ड्रॉन कॅमेऱ्यांची नजर आहे. आता माझे कुटुंब उघड्यावर पडले आहे, पण मी समाजाच्या सोबत आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Hingoli News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात उतरले आहेत. आता त्यांनी शांतता रॅली काढली असून पहिली सभा मराठवाड्यातील हिंगोलीत पार पडली. यावेळी बोलताना जरांगे पाटील कुटुंबाची आठवणीने भावनिक झाले.

माझ्या घरावर आता ड्रॉन कॅमेऱ्यांची नजर आहे. आता माझे कुटुंब उघड्यावर पडले आहे, पण मी समाजाच्या सोबत आहे, असे म्हणत त्यांनी समाजाला साथ देण्याचे आवाहन केले. त्यावर समाजानेही हम तुम्हारे साथ है, असे सांगितले.

सरकारने मला उघडे पाडायचे ठरवले आहे. मात्र तुम्ही माझ्या पाठीशी उभे रहा. मी काही केल्या मॅनेज होत नाही, मी कणखर मराठा Maratha आहे. माझ्यासोबतचे लोक फोडून सरकार मला एकटे पाडत आहे. मला बदनाम करण्याचे विविध डाव सुरू आहेत. माझी एकच चूक आहे, मी खरे बोलतो आणि ते इतरांना रुचत नाही, असे सांगताना जरांगे भावनिवक झाले होते.

सरकारनेही मराठा अभ्यासक कामाला लावले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार सगेसोयऱ्यांची मागणी न्यायालयात टिकणार नाही. पण यापूर्वी दिलेले 16 टक्के, 13 टक्के आरक्षण टिकू दिले नाही. आताही 10 टक्के आरक्षण लागू होण्यापूर्वीच याचिका दाखल झालेल्या आहे. आपली एकच मागणी ती म्हणजे ओबीसीतून आरक्षण मिळावे. मात्र माझ्या माणसांकडून माझ्या चुका काढल्या जातात. ही वेळ चुका काढण्याची नाही. माणूस चूकत असतो, असेही जरांगे म्हणाले.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Rally : शांतता रॅलीत पहिलाच वार छगन भुजबळांवर; मनोज जरांगेंचा सरकारला मोठा इशारा

बीड मध्ये मराठ्यांनी एकत्र मतदान केले म्हणून त्यांना त्रास देणे सुरू आहे. याची सरकारने नोंद घ्यावी, नाही तर जशास तसे उत्तर देऊ. सरकार आमच्यावर खोट्या केसेस करत आहे. पण मराठ्यांनी घाबरु नये. आता मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की सापडलेल्या नोंदीपैकी एक ही नोंद रद्द होऊ देऊ नये. मी मराठ्यांसाठी कट्टर आहे. मराठ्यांचा माझ्यावर विश्वास आहे तोपर्यंत लढणार, असेही जरांगेंनी Manoj Jarange ठासून सांगितले.

Manoj Jarange Patil
Mahadev Jankar Big Announcement : आता माघार नाही...,जानकरांचं ठरलं; पुढची लोकसभा 'या' मतदारसंघातून लढवणार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com