Mahadev Jankar Big Announcement : आता माघार नाही...,जानकरांचं ठरलं; पुढची लोकसभा 'या' मतदारसंघातून लढवणार!

Mahadev Jankar On Loksabha Election 2029 : एकीकडे बीडमध्ये लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांचं भाजपकडून पुनर्वसन करण्यात आलं. याचवेळी जानकरांनाही विधान परिषदेची संधी मिळू शकते अशी चर्चा जोर धरू लागली होती.
Mahadev Jankar
Mahadev JankarSarkarnama
Published on
Updated on

Akola News : रासपचे नेते महादेव जानकर यांनी मराठवाड्यातील परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे धाडस दाखवले होते.मात्र, या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या संजय जाधवांनी परभणीत आपणच बॉस असल्याचे दाखवून देताना जानकरांना पराभवाचा धक्का दिला. याच महादेव जानकरांनी (Mahadev Jankar) आता त्यांनी 2029 च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे.

एकीकडे बीडमध्ये लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांचं भाजपकडून पुनर्वसन करण्यात आलं. याचवेळी जानकरांनाही विधान परिषदेची संधी मिळू शकते अशी चर्चा जोर धरू लागली होती. पण भाजपने त्यांना विधान परिषदेची उमेदवारीही नाकारली. त्यानंतर आपल्याला राज्यसभेवर संधी दिलं जाईल असं विधान त्यांनी केलं होतं. हे विधान करुन काही दिवस उलटत नाही, तोच आता त्यांनी 2029 च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.

महादेव जानकरांनी अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील रासपच्या कार्यकर्ता मेळाव्यात मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पुढच्या लोकसभा निवडणुकीची आत्तापासूनच जोरदार तयारी सुरू केली असल्याचे पाहायला मिळत आहे. याचवेळी त्यांनी आपला मतदारसंघही निश्चित केला आहे. जानकरांनी 2029 ला आपण बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.

परभणीत शिवसेना ठाकरे गटाच्या संजय जाधवांनीसोबत झालेल्या लढतीतील आपल्या पराभवाचं कारणही सांगितलं आहे.परभणीत आपला पराभव मुस्लिम आणि दलित मतदार विरोधात गेल्याने झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.बारामतीत ताकदीने लढवून विजयी होणार असल्याचा कॉन्फिडन्सही बोलून दाखवला.

Mahadev Jankar
Maratha Vs OBC : मराठा विरुद्ध ओबीसी वाद पुन्हा पेटणार! 'आम्हीच शांत का बसावं', मनोज जरांगे पाटलांचा इशारा

भाजपच्या (BJP) तिकीटावर अनुप धोत्रेंनी बाजी मारत अकोल्याची जागा जिंकली आहे.पण आता रासपचे नेते महादेव जानकरांनी घराणेशाहीवरुन धोत्रे कुटुंबावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.ते म्हणाले,वडील आजारी असले की मुलाला तिकीट दिलं जात आहे.त्यांच्या या टीकेनंतर अकोल्याच्या राजकारणात त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

Mahadev Jankar
Vidhan Parishad Election News : विधान परिषद निवडणुकीत 'हे' छोटे पक्ष ठरणार 'किंगमेकर'; Cross Voting चा फटका कोणाला?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com