Manoj Jarange News : वाल्मिक कराडची आठवण काढणारा धनंजय मुंडे नीच माणूस; फडणवीस, पवारांचे डोळे आता तरी उघडतील का?

Manoj Jarange On Dhananjay Mundes Statement : धनंजय मुंडे जर वाल्मिक कराडची उणीव भासत असल्याचे म्हणत असेल, न्यायालय बघून घेईल असं सांगत असेल तर मग पुढे काय होईल? याचा विचार मराठा समाजाने केला पाहिजे.
Manoj Jarange Patil On Fadnavis-Ajit Pawar-Dhananjay Munde News
Manoj Jarange Patil On Fadnavis-Ajit Pawar-Dhananjay Munde NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. परळीतील सभेत धनंजय मुंडेंनी घेतलेल्या वाल्मिक कराडच्या उल्लेखावर मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

  2. त्यांनी फडणवीस आणि अजित पवार यांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली.

  3. या विधानामुळे परळी व महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा चर्चा आणि तणाव निर्माण झाला आहे.

Marathwada Politics : परळीच्या सभेतील भाषणात आमदार धनंजय मुंडे यांनी अप्रत्यक्षरित्या वाल्मीक कराडची आठवण काढली. आपल्यातील एक व्यक्ती इथे दिसत नाही, याची जाणीव होते. काय झालं, चुकलं की नाही ते न्यायालय बघेलं, असे विधान मुंडे यांनी केले. यावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे हा नीच माणूस असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आता तरी डोळे उघडतील का? असा सवालही जरांगे यांनी केला.

परळी नगर परिषदेच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड यांची आठवण काढताना केलेल्या विधानाने एकच खळबळ उडाली आहे. सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या आरोपीची आठवण जर धनंजय मुंडेनी काढली असेल, तर त्याच्या इतका नीच माणूस दुसरा कोणी नाही, असा संताप मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. फडणवीस, पवारांनी धन्या मुंडेंच्या पापात सहभागी होऊ नये, अन्यथा त्यांचाही नाश होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याचा धनंजय मुंडे यांच्यावर जाहीर आरोप आहे. यावर नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग अन् सीबीआय चौकशीची मागणी करत धनंजय मुंडे यांनी पलटवार केला. पण ही मागणी त्यांच्याच अंगलट आल्याचे बोलले जात आहे. मनोज जरांगे पाटील हे मुंडेंना वारंवार नार्को टेस्टला चल म्हणून आव्हान देत आहेत. वाल्मिक कराडची आठवण काढल्याबद्दल माध्यमांनी जेव्हा जरांगे पाटील यांना विचारले, तेव्हा त्यांनी हा अत्यंत नीचपणा असल्याचे सांगत आता तरी धनंजय मुंडेवर कारवाई करा, अशी मागणी केली.

Manoj Jarange Patil On Fadnavis-Ajit Pawar-Dhananjay Munde News
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी धनंजय मुंडे याला वाचवून पापाचे भागीदार होऊ नये! जरांगे पाटलांकडून गंभीर आरोप

गुंडगिरी, जमीनी हडपणे आणि त्यातून सत्ता मिळवणे हाच धनंजय मुंडे व त्याच्या टोळीचा धंदा आहे. धनंजय मुंडे जर वाल्मिक कराडची उणीव भासत असल्याचे म्हणत असेल, न्यायालय बघून घेईल असं सांगत असेल तर मग पुढे काय होईल? याचा विचार मराठा समाजाने केला पाहिजे. संतोष भैय्या देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील एक आरोपी जरी सुटला तर देवेंद्र फडणवीस, अजित पवारांना आम्ही सोडणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.

Manoj Jarange Patil On Fadnavis-Ajit Pawar-Dhananjay Munde News
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना झाली वाल्मिक कराडची आठवण; आपल्या सोबत एक व्यक्ती नाही याची जाणीव होत असल्याचे विधान!

बीड कारागृह निरीक्षकाची बदली का?

बीड कारागृह निरीक्षक हा नियमाने चालत होता, आरोपींना घरच्या जेवणाचे डबे मिळू देत नव्हता, अशी आमची माहिती आहे. त्याची बदली राजकीय दबावतूनच झाली की काय? अशी शंका आता येऊ लागली आहे. वाल्मिक कराडची उणीव भासत असल्याचे सांगणाऱ्या धनंजय मुंडेला किती पाठीशी घालायचे? याचा विचार आता फडणवीस, पवारांनी केला पाहिजे.

माझ्या हत्येच्या कटापासून धन्या तोंड लपवत आहे. मी अनेकदा नार्को टेस्टला चल म्हणून त्याला आव्हान दिले, पण तो पुढे येत नाही. संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या आरोपीची उणीव भासू लागली असं जर धनंजय मुंडे म्हणत असले तर अशा माणसाला किती दिवस सांभाळायचं? याचा विचार फडणवीस, पवारांनी केला पाहिजे. नसता त्याच्या पापात तुमचाही नाश होईल, याचा पुनरुच्चार मनोज जरांगे पाटील यांनी केला.

5 FAQs (Marathi)

1. मनोज जरांगे पाटील यांनी कोणावर आरोप केले?
त्यांनी धनंजय मुंडेंच्या वाल्मिक कराड संदर्भातील वक्तव्यावर टीका केली.

2. त्यांनी कोणाकडे कारवाईची मागणी केली?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे.

3. वादाचे मूळ कारण काय आहे?
मुंडेंनी वाल्मिक कराडची आठवण काढत केलेले वक्तव्य आणि त्यावरील प्रतिक्रिया.

4. या प्रकरणामुळे राजकारणात काय घडत आहे?
परळी आणि बीड परिसरात वाद वाढला असून राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

5. हे विधान कोठे करण्यात आले?
जरांगे पाटील यांनी पत्रकारांच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना ही मागणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com