Manoj Jarange Live : 'सागर बंगल्यावर येतो, आता गोळ्या घाला' म्हणत मनोज जरांगे मुंबईकडे रवाना

Devendra Fadnavis Sagar Bungalow : मी एकटाच फडणवीसांच्या निवासस्थानी जाणार आहे. वाटेत कुणीही अडवू नय
Manoj Jarange, Devendra Fadnavis
Manoj Jarange, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : आधी पोलिसांच्या वतीने गोळीबार करून, आता फूट पाडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आंदोलनात फूट पाडायचे षडयंत्र आहे. त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथ आहे. फडणवीसांना राज्यात मराठे मोठे झालेले पाहायचे नाही. त्यासाठी त्यांनी मला वेळवेळी संपवण्याचा प्रयत्न केला. सलाईनच्या माध्यामातून विष देण्याचाही त्यांचा प्रयत्न होता. एन्काऊंटर करण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. त्यांना माझा बळी हवा आहे तर मीच त्यांच्या सागर बंगल्याकडे येतो, असे आव्हान देत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) येथील झालेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टोकाचे गंभीर आरोप केलेले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी होती. सगेसोयऱ्यांबाबत सरकारने अधिसूचनाही काढलेली असताना मराठ्यांना 10 टक्के आरक्षण देण्यात आले. ते आपल्याला मान्य नाही. आपण आपल्या मूळ मागणी पूर्ण केल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशाराही मनोज जरांगेंनी दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manoj Jarange, Devendra Fadnavis
Manoj Jarange Vs Devendra Fadnavis : पाटील... पाटील... दादा.. दादा...; जरांगेंना शांत करता-करता आंदोलकांची दमछाक

'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास फडणवीसांचा मोठा विरोध आहे. त्यांनी मनात आणले असते तर लगेच मराठ्यांच्या सगेसोयऱ्यांबाबत अमंलबजावणी केली असती. मात्र त्यांना ते नको आहे. यासाठी त्यांना इतर मंत्र्यांचीही साथ आहे. मला संपवून मराठ्यांचा आवाज दाबण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र मी मराठ्यांचा नेता नसून शेतकऱ्यांचा मुलगा या नात्याने गोरगरीब मराठ्यांसाठी काम करत आहे. त्यांना माझा बळी हवा असेल तर त्यांनी तो घ्यावा. आता मीच सागर बंगल्याकडे येतो,' असे म्हणत जरांगे आता मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

Manoj Jarange, Devendra Fadnavis
Jarange Vs Fadnavis : जरांगे-पाटलांचे गंभीर आरोप, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

अंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळी जारांगे पाटील गेल्या 15 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. त्यामुळे त्यांची तब्येत चांगली नाही. त्यांना अशक्तपणा आहे. अशा स्थितीतही ते फडणीसांवर गंभीर आरोप करताना अचानक उठले. मी सागर बंगल्यावर जातो, मी एकटाच जाणार आहे. माझ्या मागे कुणीही येऊ नये, असे आवाहनही जरांगे पाटलांनी केले.

जरांगे पाटालंचे (Manoj Jarange) रौद्ररुप पाहून मराठा समाजाबांधवांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. जरांगेच्या भावनांचा झालेला उद्रेक पाहून समाजबांधवांनी मोठी चिंता व्यक्त केली. मात्र ते मुंबईला जाण्यावर ठाम होते. त्यावर आंदोलकांनीही साथ देत जरांगेंच्या सोबत जाण्यासाठी वाहने काढली. आता जरांगे पाटील वाहनांतून फडणवीसांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी सागर बंगल्याकडे रवाना झाले आहेत.

Manoj Jarange, Devendra Fadnavis
Manoj Jarange Patil : जरांगेंचा बोलविता धनी सिल्वर ओक की जालन्यातील भैया फॅमिली? भाजप आमदार प्रसाद लाडांचा सवाल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com