Manoj Jarange On Dhananjay Munde : 'खेटू नको, तरी खेटले, आता बघतोच'; जरांगेंचा मंत्री मुंडेंना ललकारत 'लफडी' बाहेर काढण्याचा इशारा

Manoj Jarange Minister Dhananjay Munde protest rally Jalna Beed Santosh Deshmukh murder case : जालना इथल्या मराठ्यांच्या जनआक्रोश मोर्चात हजेरी लावून पुढं उपचारासाठी रवाना झालेले मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडेंना इशारा दिला आहे.
Manoj Jarange 1
Manoj Jarange 1Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधासाठी परभणीत काढण्यात आलेल्या मोर्चात मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर ऐकरी टीका केली होती.

यानंतर मनोज जरांगेंविरोधात काही पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. आता जालना इथं काढण्यात आलेल्या मोर्चात, मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मंत्री मुंडेंना ललकारलं आहे. त्यामुळं जरांगेविरुद्ध मंत्री मुंडे यांच्यातील संघर्ष तीव्र होणार, अशी चर्चा आहे.

संतोष देशमुख हत्येच्या निषेधासाठी जालना इंथ आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्या मोर्चा मनोज जरांगे यांनी हजेरी लावून तब्येत ठीक नसल्याने ते पुढं उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना, मंत्री धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) संताप व्यक्त केला.

Manoj Jarange 1
Santosh Deshmukh Murder Case : जनआक्रोश मोर्चात आमदार सुरेश धस यांना 'नो एन्ट्री'; 'मोठं' कारण आलं समोर

"धनंजय मुंडे जातीयवाद निर्माण करायचा आहे. प्रतिमोर्चे काढण्यासाठी ते प्रोत्साहन देत आहे. पण आम्ही गरीबाच्या लेकरांसाठी लढत आहोत, हे ओबीसींना (OBC) माहीत आहे. ते जातीय तेढ निर्माण करत असून, लाभार्थी टोळीला आमच्याविरोधात बोलायला लावत आहेत. पण धनंजय मुंडे यांचे परळी ते मुंबई बरेच लफडे आहेत. त्यांना 25 तारखेनंतर कायदेशीर बघणार. त्यांना सांगितले होते खेटू नका, ते खेटले, मग आता त्यांना बघतोच", असा इशारा मनोज जरांगेंनी दिला.

Manoj Jarange 1
Sudhir Mungantiwar Press Conference : ठाकरेंना बरोबर घ्यायचं का? भाजप आमदार मुनगंटीवार यांनी स्पष्टचं सांगितलं

मंत्री धनंजय मुंडे हे कोणत्या जातीचे नाही, तर सरकारचे मंत्री आहेत. ते ओबीसीचे पांघरूण घेत आहे. धनंजय देशमुख यांना तुम्ही पोलिस ठाण्यात धमकी देतात, आणि आम्ही गुंडावर बोलायचे नाही का? तुम्हाला आमचे लोक कापायचे आहे का? असा सवाल करत मनोज जरांगेंनी संताप व्यक्त केला.

संतोष देशमुख यांची हत्या होऊन एक महिना झाला. तरी सर्व आरोपींना अटक झालेली नाही. राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे हेऊ शकत नाही. एवढं होऊन देखील त्यांना पोसणारे मंत्री म्हणून फिरत आहे. यामुळे पोलिस प्रशासन आणि गृह विभागावर संशय जालनामधील मोर्चातील आंदोलकांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com