Manoj Jarange News : बीड, परळी, केजमधील इच्छुकांनी गाठले अंतरवाली सराटी; मविआ, महायुतीतील नेते जरांगेंच्या भेटीला

Political News : विधानसभा निवडणुकासाठी आतापासूनच इच्छुकांनी उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. याच दरम्यान मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी बीड जिल्ह्यातील विधानसभा इच्छुकांची रांग लागली आहे.
Manoj Jarange News
Manoj Jarange News Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. सध्या निवडणुकीची घोषणा होण्याची सर्वच जण वाट पाहत असतानाच दुसरीकडे मनोज जरांगे यांनीही उमेदवार रिंगणात उतरविणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळेच गेल्या दोन दिवसांत मनोज जरांगे यांची अनेक नेत्यांनी भेट घेत त्यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे.

विधानसभा निवडणुकासाठी आतापासूनच इच्छुकांनी उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. याच दरम्यान मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी बीड जिल्ह्यातील विधानसभा इच्छुकांची रांग लागली आहे. विशेष म्हणजे महायुतीतील भाजप (Bjp), शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) नेतेही जरांगे पाटलांना भेटत आहेत. (Manoj Jarange News )

महायुतीत तीन पक्ष एकत्र आल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी आगामी विधानसभा निवडणुक लढवायची का, याबाबतची बैठक पुढे ढकलली असली तरी शुक्रवारी त्यांनी अंतरवाली सराटी येथे जिल्ह्यातील बीड, परळी, केज मतदारसंघातील इच्छुकांची आढावा बैठक बोलविली होती. या बैठकीसाठी जिल्ह्यातील चळवळीत पदाधिकाऱ्यांसह आघाडी व महायुतीचे नेतेही उपस्थित होते.

शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, सनदी लेखापाल बी. बी. जाधव, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, राष्ट्रवादीचे बळीराम गवते, माजी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक थोरात, भाजपचे राजेश देशमुख, शिवसंग्राम पक्षाचे प्रभाकर कोलंगडे, स्वप्नील गलधर, चंद्रकांत नवले, हारुण इनामदार, दिलीप गोरे, हनुमान मुळीक, गंगाधर काळकुटे, माधव जाधव, गोकुळ जाधव, अनिल घुमरे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Manoj Jarange News
Bjp News : नड्डांचा दौरा अचानक रद्द; फडणवीस गाठणार गोवा; मंत्रिमंडळ फेरबदल...

दरम्यान, भाजपचे रमेश आडसकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनीही मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. गेल्या चार दिवसांत जरांगे यांची भेट अनेक नेतेमंडळींनी घेतली आहे.

दरम्यान, आठ दिवसापूर्वी अंतरवाली सराटीत येत नांदेड जिल्ह्यातील भाजपच्या नेत्या मिनल खतगावकर यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली होती. खतगावकर या नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथून विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहेत. त्यानंतर बीड जिल्ह्यातील केजच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेत थेट तिकीटाचीच मागणी केली. त्या केज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे समजते.

Manoj Jarange News
Ajit Pawar : अजित पवारांनी भाषण सुरू असतानाच काढला डोक्यावरील फेटा, नेमकं कारण काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com