OBC Reservation News : मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवालीतच जीआरची होळी! ओबीसी उपोषणाचा तिसरा दिवस..

At Antarwali a government resolution (GR) was burnt. : प्रा. विठ्ठल तळेकर, बाळासाहेब दखणे, बाबासाहेब बटुळे, श्रीहरी निर्मळ, आसाराम डोंगरे यांनी सुरू केलेले उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच ठेवले.
OBC activities Protest In Antarwali News
OBC activities Protest In Antarwali NewsSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation News : मराठा आरक्षणाचा लढा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ज्या अंतरवाली सराटीमधून राज्यभरात पोहचवला, त्या अंतरवालीत त्यांनी सरकारकडून मान्य करून घेतलेल्या मागण्यांच्या जीआरची होळी करण्यात आली. मराठा आरक्षणा संदर्भात जीआर काढून मुख्यमंत्र्यांनी ओबीसींच्या पाठीत खंजीर खूपसला, असा आरोप करत अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषणाला बसलेल्या आंदोलकांनी जीआरची होळी केली.

ओबीसी आरक्षण (OBC) बचाव म्हणत अंतरवालीत सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू केलेले बेमुदत उपोषण पाचव्या दिवशी संपले. सरकारने हैदराबाद, सातारा गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेत मनोज जरांगे पाटील यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या. एवढेच नाही तर या संदर्भात जीआर काढत मुंबईतील आंदोलन संपुष्टात आणले. तर दुसरीकडे अंतरवाली सराटीत ओबीसी आंदोलकांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते.

आज या आंदोलकांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना सरकारने दिलेल्या जीआरची होळी करत निषेध व्यक्त केला. अंतरवाली सराटीतील सोनिया नगर येथे ओबीसी आरक्षण बचाव समितीकडून हैदराबाद गॅझेटियर अध्यादेशाची होळी करत प्रा. विठ्ठल तळेकर, बाळासाहेब दखणे, बाबासाहेब बटुळे, श्रीहरी निर्मळ, आसाराम डोंगरे यांनी सुरू केलेले उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच ठेवले.

OBC activities Protest In Antarwali News
Maratha Reservation : हे आरक्षण टिकणार नाही, माजी न्यायाधीशाने स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'जीआर बघून हतबल झालो'

शासनाने ओबीसीवर अन्याय केला आहे. हैदराबाद गॅझेटियर शासनाने लागू करण्यासाठी अध्यादेश काढला असून ही ओबीसीमध्ये घुसखोरी आहे. आम्ही याचा निषेध करत आहोत, उपोषणासोबतच राज्यभरात ओबीसी समाज तीव्र आंदोलन करणार असून आता आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाचा विश्वासघात केला आहे. मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासाठी अध्यादेश काढल्यामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आले आहे.

OBC activities Protest In Antarwali News
OBC Reservation : जरांगेंनी उपोषण सोडलं, आता ओबीसींच्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट; फडणवीसांचे आवाहन व्यर्थ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोपही ओबीसी नेते बळीराम खटके यांनी यावेळी केला. दरम्यान, अंतरवाली येथे सुरू असलेल्या ओबीसी बचाव समितीच्या बेमुदत उपोषणाला तिसऱ्या दिवशी माजी आमदार नारायण मुंडे, प्रा.सत्संग मुंडे, समता परिषदेचे प्रा.रविंद्र खरात, अॅड. राम कुऱ्हाडे, सुनिल पाखरे आदींनी यांनी भेट दिली. तसेच माजलगाव, पार्थडी, बीड, जालना, आदी ठिकाणच्या समाज बांधवांनी उपोषणाला भेट देऊन शासनाचा निषेध केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com