Manoj Jarange News : मनोज जरांगेंचा 'रास्ता रोको'त बदल; आता 'अशी' ठरली आंदोलनाची रणनीती

Rasta Roko for Maratha Reservation : 10 टक्के आरक्षण दिल्याने सरकारचा निषेध आणि सगेसोयऱ्यांच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी रास्ता रोको आंदोलन
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : मराठा समाजाला विशेष अधिवेशनात स्वतंत्रपणे एसईबीसी प्रवर्गातून 10 आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर करण्यात आले. मात्र, हा निर्णय मान्य नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सगेसोयऱ्यांबाबत काढलेल्या निवेदनाची अंमलबजावणी होणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी 24 फेब्रुवारी ते 3 मार्च राज्यात रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे. आता या आंदोलनात थोडासा बदल करण्यात आला आहे. (Manoj Jarange News)

रास्ता रोको आंदोलनात झालेल्या बदलाची माहिती जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे आणि त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही त्याचा सशर्त लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) निवेदन काढले होते. त्याच निवेदनाची अंमलबजावणी होण्याची अपेक्षा होती. मात्र, सरकारने तसे न करता दहा टक्के आरक्षणाचा घाट घातला. त्याचा निषेध आणि सगेसोयऱ्यांच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. ठरल्याप्रमाणे राज्यात रास्ता रोको सुरू होईल. मात्र, बारावीच्या परीक्षा आणि इतर समाजबांधवांच्या कार्यक्रमानिमित्त या आंदोलनात थोडे बदल करण्यात आलेले आहेत.

Manoj Jarange
Raj Thackery Tour : फटाके मनसेचे... स्वागत भाजप खासदाराचे; कल्याणमध्ये नेमकं काय झालं?

असे असणार आंदोलनाचे स्वरूप

मराठा आंदोलक (Maratha Reservation) राज्यभर रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. ठरल्याप्रमाणे शनिवारी सकाळी साडेदहा ते दुपारी एक असे आंदोलन होणार आहे. या आंदोलनावेळी बारावीच्या कुठल्याही विद्यार्थ्यांना अडचण नको. मुलींना कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यांना परीक्षा स्थळापर्यंत पोहाेचू देणे हे मराठा समाजाचे कर्तव्य असणार आहे. त्यामुळे हे आंदोलन सकाळी 11 वाजता सुरू करावे.

दरम्यान, हे आंदोलन 3 मार्चपर्यंत होणार होते. यात मात्र बदल करण्यात आला आहे. शनिवारचा रास्ता रोको झाल्यानंतर लगेच याचे रूपांतर धरणे आंदोलनात करण्यात आले आहे. 25 फेब्रुवारीपासून गावागावांतील ग्रामपंचायत, तलाठी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manoj Jarange
Manohar Joshi News : मनोहर जोशींचं मोठं धाडस अन् महाराष्ट्र उजळला; खडसेंनी सांगितली ऐतिहासिक घटना

अधिकाऱ्याने निवेदन स्वीकारावे, अन्यथा..

राज्यात मराठा समाज मोठा भावाच्या भूमिकेत आहे. आपल्या न्यायासाठी दुसऱ्या कुणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी आपण घेणार आहोत. त्यासाठीच रास्ता रोकोऐवजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलकांनी दररोज शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन द्यायचे आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत शासनाच्या कुठल्याही अधिकाऱ्याने आंदोलनस्थळी जाऊन निवेदन स्वीकारावे. निवेदन स्वीकारले नाही तर लगेच रास्ता रोको आंदोलन करावे, असा इशाराही जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) दिला आहे. दरम्यान, २५ नंतर रास्तारोको करायचा की धरणे आंदोलन करायचे, याबाबत अंतरवाली सराटीत बैठक घेऊन पुढील निर्णय ठरवू, असेही जरांगे पाटलांनी सांगितले.

कुणालाही अडचण येणार नाही

मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान राज्यभर संत रोहिदास यांची जयंती आहे. त्यासाठी चर्मकार बांधवांनी जोरदार तयारी केलेली आहे. तसेच नाशिकमध्ये बंजारा बांधवाचा उत्सव आहे. त्यासाठी राज्यभरातून लोक येणार आहेत. यांसह विविध समाजाची निवेदने जारांगेंना मिळाली आहेत. त्यावर ते म्हणाले, रास्ता रोको असला तरी मोठा भाऊ या नात्याने मराठ्यांकडून कुठल्याही समाजाला त्यांच्या कार्यक्रमासाठी अडचण येणार नाही. मराठा आंदोलक तुम्हाला वाट मोकळी करून देतील, असा शब्दही जरांगे पाटलांनी दिला.

(Edited by Sunil Dhumal)

R

Manoj Jarange
Parinay Fuke : नुकसानभरपाईपासून लोक होते वंचित, डॉ. फुकेंनी असा खेचून आणला निधी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com