Parinay Fuke : कोरोना संकटाच्या 2020 ते 2022 या काळात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतातील पिकांचे तसेच मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. सरकारने कबूल करूनही २०२४ उजाडले तरी नुकसानभरपाई जनतेला दिली नाही, पण माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून हा निधी खेचून आणला आहे.
त्या संकटाच्या काळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची शेतजमीन, मासेमारी व्यवसाय, घरे, पिकांसह अन्य नुकसानाचा पंचनामा करून विभागीय स्तरावर शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र, नुकसानाची भरपाई त्या काळात नाही आणि नंतरही देण्यात आली नाही. ही बाब लक्षात घेऊन डॉ. परिणय फुके यांनी हा मुद्दा सरकारकडे लावून धरला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
उशिरा का होईना, पण डॉ. फुकेंच्या पाठपुराव्याची दखल सरकारने घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्रितपणे नुकसानग्रस्तांच्या हितासाठी एक पाऊल पुढे टाकले आणि केवळ भंडारा-गोंदियाच नव्हे तर संपूर्ण राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 106 कोटी 64 लाख 94 हजार रुपयांची मदत जाहीर केली. डॉ. फुकेंच्या भंडारा-गोंदिया जिल्ह्यांसाठी तब्बल 5 कोटी रुपयांची तरतूद शासनाने केली आहे.
सरकारने अलीकडेच पिकांच्या नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली होती. राहिले होते ते कोविड संकटाच्या काळात व्यवसाय, घरे गमावून बसलेले लोक. यामध्ये पुराच्या तडाख्यात सापडलेले लोकदेखील होते. राज्य शासनाने 21 फेब्रुवारी 2024 रोजी घेतलेल्या निर्णयात भंडारा जिल्ह्यातील बाधितांना मदत म्हणून 2 कोटी 95 लाख 7 हजार रुपये आणि गोंदिया जिल्ह्यात 1 कोटी 94 लाख 83 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सरकारने जाहीर केलेला निधी थेट बाधितांच्या बँक खात्यात जमा केला जाईल, असे डॉ. फुके यांनी सांगितले.
Edited By : Atul Mehere
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.