Video Prakash Ambedkar : "जरांगे-पाटलांनी 288 उमेदवार उभे करावेत, पण...", प्रकाश आंबेडकरांनी काय दिला सल्ला?

Prakash Ambedkar On Manoj Jarange Patil : मनोज जरांगे-पाटील यांना कशासाठी झुलवत ठेवलं आहे, याचं कारणंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे.
prakash ambedkar,  manoj jarange
prakash ambedkar, manoj jarangeSarkarnama

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला 13 जुलैपर्यंत सरकारला मुदत दिली आहे. अन्यथा 288 मतदारसंघात उमेदवार उभे करायचे की पाडायचे, असा इशाराही जरांगे-पाटलांनी दिला आहे.

यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष, प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी भाष्य केलं आहे. 288 ठिकाणी उमेदवार उभे करावेत, असं म्हणत आंबेडकरांनी जरांगे-पाटलांना एक सल्लाही दिला आहे. यावर जरांगे-पाटील काय प्रतिक्रिया देतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

प्रकाश आंबेडकरांनी काय म्हटलं?

प्रकाश आंबेडकर म्हणाले, "मराठा आरक्षण ( Maratha Reservation ) मिळो अथवा ना मिळो जरांगे-पाटलांनी 288 जागा लढवाव्यात. पण, 'एससी' आणि 'एसटी'चे मतदारसंघ सोडून उरलेल्या ठिकाणी गरीब मराठा उमेदवारांना उभे करावे. निवडणुकीचं भवितव्य कोण सांगू शकेल. लोकांच्या मनात असेल, तर मतदान देतील."

prakash ambedkar,  manoj jarange
Prakash Ambedkar : 'कोण दलितांसाठी लढतंय ते ओळखा', दुरावलेली मतपेढी परत मिळवण्यासाठी प्रकाश आंबेडकर 'अ‍ॅक्शन मोड'वर

"मराठा समाजाचे 31 खासदार निवडून आले आहेत. ते एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे जरांगे-पाटलांना झुलवत ठेवलं आहे. जरांगे-पाटलांना गरीब मराठ्यांना न्याय द्यायचा असेल, 'एससी', 'एसटी'च्या जागा सोडून उरलेल्या जागांवर गरीब मराठा उमेदवार उभे करावेत," असा सल्ला आंबेडकरांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com