Mumbai News : मराठा आरक्षणासाठी गेल्या वर्षभरापासून मोठा लढा उभारला आहे.या लढ्यात मराठा समाजही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे.त्याच जोरावर जरांगे कुणाचीही भीडभाड न ठेवता सरकारवर हल्ला चढवितात. त्यांच्या या आंदोलनाचा सत्ताधारी महायुतीला मराठवाड्यात चांगलाच फटका बसला होता.
आता त्यांनी आरक्षण दिले नाही तर विधानसभा निवडणुका लढवण्याचीही तयारी दर्शवली आहे. अशातच आता त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून त्यात स्वत:सह सहकार्यांच्या जीवाची पर्वा न करता जरांगेंनी वाहत्या नदीत कार घातल्याचे दिसून येत आहे. या त्यांच्या 'प्रतापा'ची चांगलीच चर्चा सुरू आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे बीड दौऱ्यावर आहेत. यात त्यांनी आता विधानसभा निवडणुकांसाठी मेळावे, बैठका, दौरे यांच्यावर भर देत मराठा समाजाची मोट बांधण्याचा जोरदार प्रयत्न करत सुरू केले आहे.पण याचवेळी जरांगेनी जीव धोक्यात घालून प्रवास केला. यामुळे मराठा आंदोलकांची काही क्षणांसाठी धडधड वाढली आहे.
बीड जिल्ह्यातील सूर्याची वाडी येथे पोचत असताना धुमाळवाडी येथील नदीचा पूल वाहून गेला. त्यामुळे गावात पोचण्यासाठी पर्यायी चांगला रस्ताच नसल्याचे समोर आले. तसेच पुलाचेही काम सुरू असल्याचे दिसून आले. अशातच मग मनोज जरांगे यांचा ताफा अनेक गाड्यांसह धुमाळवाडीकडे जाणार होता.
जरांगेंनी थेट वाहत्या नदीच्या प्रवाहात गाडी घालण्याचे धाडस दाखवले.नदीचं पाण्याचा प्रवाह सुरू असताना त्यांनी मोठी रिस्क घेत जीवघेणा प्रवास केला. नदीला पूर आलेला असताना त्यांनी पाण्यामधून गाडी घालत त्यांनी जीवघेणा प्रवास केल्याने त्यांच्या सहकारीही जीव मुठीत धरून बसले होते. पण नंतर सुखरुपपणे नदी पार केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
सिंधुदुर्गजवळील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अचानक कोसळल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या मुद्यावरून राजकारणही सुरू झाले आहे. या घटनेवर आता जरांगेंनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेवर बोलताना या घटनेचं राजकारण करु नये.1 सप्टेंबर रोजी आपण राजकोट किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करणार असल्याच जरांगे पाटील यांनी म्हटलंय. तसेच ठाकरे आणि राणे गटात झालेल्या राड्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी दोन्ही पक्षांच्या नेत्यांना खडेबोल सुनावतानात राजकारण करायला भरपूर जागा आहे,असंही म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.