Maratha Reservation : ‘समान आडनाव’ असेल तर मिळेल का कुणबी दाखला? मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाची व्याप्ती वाढवली...

Manoj Jarange Expands Scope of Maratha Reservation : एकसारखे आडनावाचा हा मुद्दा पुढे जाऊन तापण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात आणि प्रामुख्याने मराठवाड्यात कुणबीच्या सुमारे 58 लाख नोंदी सापडल्या आहेत.
Manoj Jarange
Manoj Jarange Sarkarnama
Published on
Updated on

Kunbi Certificate Eligibility: Does Same Surname Qualify? : मुंबईत उपोषण केल्यानंतर मनोज जरांगे यांची हैद्राबाद गॅझेटची मागणी राज्य सरकारने मान्य केली. त्यानुसार नोंदी सापडलेल्या किंवा त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र मिळवत कुणबी असल्याचे सिध्द करणाऱ्यांना तसे प्रमाणपत्र मिळणार आहे. आता जरांगेंनी गुरूवारी दसरा मेळाव्यातून नवा मुद्दा चर्चेत आणला आहे. ‘समान आडनाव’ असलेल्या मराठा समाजातील सर्वांनी अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

जरांगे पाटील यांच्या समान आडनाव्याच्या मुद्दयावर चर्चेला तोंड फोडले आहे. आडनाव सारखे असणारे तुमची भावकी, तुमचे नातेसंबंध, कुळ एक आहे. एकसारखे आडनाव असेल तर त्याला फोन करा. त्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र असेल तर त्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेत अर्ज करा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी गुरूवारी केले. दिवाळीपर्यंत सर्वांना कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करा, असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.

एकसारखे आडनावाचा हा मुद्दा पुढे जाऊन तापण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात आणि प्रामुख्याने मराठवाड्यात कुणबीच्या सुमारे ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत. त्या नोंदी गावागांवात पाहण्यासाठी लावण्याची जरांगे यांची मागणी सरकारने आधीच मागणी केली आहे. जरांगे यांनी पुन्हा त्याचा पुनरूच्चार केला. या नोंदी पाहून समान आडनाव असेल तर कुणबी प्रमाणपत्र मिळणे, असे सोपे होणार असल्याचे जरांगे पाटील यांना सुचवायचे आहे.

Manoj Jarange
Manoj Jarange Patil News : विखे पाटलांचा फोन, पण जरांगेंचा प्लॅन ठरला; नारायणगडावरून केली मोठी घोषणा...

समान आडनाव हा निकष आरक्षणासाठी जरांगे यांनी पहिल्यांदाच पुढे आणला आहे. याबाबत आंदोलनादरम्यानही त्यांनी काही चर्चा केली नव्हती. मराठा समाजामध्ये समान आडनाव म्हणजे एकच कुळ, हे ग्राह्य धरल्यास आरक्षणाची व्याप्ती वाढू शकते. केवळ नातेसंबंध किंवा नातेवाईक एवढीच त्याची मर्यादा असणार आहे. अनेक गावांमध्ये समान आडनाव असलेल्यांची मोठी संख्या असते. अनेकांनी बोगस कुणबी प्रमाणपत्र मिळविल्याचा आरोप ओबीसी समाजातील नेते करतात. जरांगे यांच्या आंदोलनादरम्यानही हा आरोप झाला होता.

हैद्राबात गॅझेट लागू होण्यापूर्वीही मराठा समाजातील अनेकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेले आहे. तर नव्याने नोंदी सापडलेल्यांनाही सहजपणे कुणी प्रमाणपत्र मिळणार आहे. हे प्रमाणपत्र मिळालेले किंवा नोंदी आढळून आलेल्यांच्या आडनावाशी साधर्म्य असल्यास त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळेल, असे मनोज जरांगे पाटील यांचे म्हणणे आहे. त्यासाठीच त्यांनी समान आडनाव असलेल्यांकडे जाऊन त्यांचे प्रतिज्ञापत्र घेण्याचे आवाहन केले आहे.

Manoj Jarange
Manoj Jarange Dasara Melava : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांआधी मनोज जरांगेंनी ठोकला शड्डू; महायुतीचं टेन्शन वाढलं...

प्रतिज्ञापत्रासह आवश्यक कागदपत्रे व अर्ज सादर करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यामुळे आता प्रशासनाची कसरत होणार आहे. केवळ समान आडनावाचा निकष प्रशासन ग्राह्य धरणार का, याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. हैद्राबाद गॅझेट लागू करण्याच्या जीआरमध्येही त्याचा उल्लेख नाही. त्यामुळे याबाबतचा संभ्रम वाढण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com