Manoj Jarange Speech : मोदी-शाहांनी फडणवीसांना समज द्यावी; जरांगे पाटलांनी सुनावले खडेबोल

Manoj jarange Rally News : "पंतप्रधान मोदींना विनंंती आहे, त्यांनी देवेंद्र फडणवीसांना समज द्यावी..."
Manoj Jarange and Devendra Fadnavis
Manoj Jarange and Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Jalna News : अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटलांची शनिवारी भव्य सभा पार पडली. या सभेत जरांगे पाटलांनी सरकारला इशारा देत मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही एक इंचही मागे हटणार नाही, सरकारकडे 40 दिवसांतील फक्त 10 दिवस उरलेत, असा थेट अल्टिमेटम दिला. या वेळी मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांनादेखील खडेबोल सुनावले.

मनोज जरांगे पाटलांना अटक करण्यात यावी, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिसांकडे केली होती. यावरूनच जरांगे पाटलांनी सदावर्ते यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच गुणरत्न सदावर्ते हे कुणाचं पिल्लू आहे, हे सगळ्यांना माहीत असून, मी अशा चेल्यांना उत्तर देत नसतो, अशा शब्दांत सुनावलं.

Manoj Jarange and Devendra Fadnavis
Manjo Jarange Bhashan : 'माझ्या नादी लागाल तर सोडणार नाही'; जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा

देवेंद्र फडणवीसांना सुनावले खडेबोल...

"सदावर्ते हे फडणवीसांचे कार्यकर्ते आहेत. त्यांना सांभाळा, मराठ्यांना अंगावर घेऊ नका. मराठ्यांनी तुमचे 106 आमदार निवडून दिलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीसांना समज द्यावी. खालचे कार्यकर्ते ते आमच्या अंगावर घालत आहेत. मराठ्यांना विरोध करायचे बंद करा आणि मराठा समाजाला तातडीने आरक्षण जाहीर करा. हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील", असे जरांगे पाटील म्हणाले.

जरांगे पाटलांनी फडणवीसांना याआधीही सुनावलं होतं

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी गावामध्ये मनोज जरांगे हे उपोषणाला बसले होते. 1 सप्टेंबरला आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली होती. आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. तसेच पोलिसांनी गोळीबार केल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला होता. यानंतर या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटले होते.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मग पोलिसांनी केलेला लाठीचार्ज हा गृहमंत्र्यांच्या आदेशाने करण्यात आला का ? असा सवाल उपस्थित करत जरांगे पाटलांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला होता. यानंतर आता शनिवारी झालेल्या सभेत जरांगे पाटलांनी थेट पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांनीच फडणवीसांना समज द्यावी, अशी मागणी केली आहे.

Edited By- Ganesh Thombare

Manoj Jarange and Devendra Fadnavis
Manoj Jarange Speech Top 10 Points : मनोज जरांगे पाटलांच्या भाषणातील 10 ठळक मुद्दे कोणते ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com